आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरे, वाहन उद्योगाकडून स्वागत, तर उद्योजक नाराज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कमी करण्याच्या निर्णयामुळे घर खरेदीदार, विकासक तसेच वाहन उद्योगाच्या वतीने कर्जाचा भार कमी हाेण्यास मदत हाेणार असल्याने स्वागत केले आहे. मात्र, त्याच जोडीला अाैद्याेगिक वाढ अाणि मागणीला गती देण्यासाठी ही कपात पुरेशी नाही, असे मत उद्योजकांनी व्यक्त केले अाहे.

रेपाे दरात किमान अर्धा टक्क्याने कपात करतानाच राेख राखीव प्रमाण कमी झाले असते तर बँकांना त्यांचा निधीचा खर्च कमी करण्यास मदत झाली असती, असे सर्वसाधारण मत या क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले. रेपाे दर कपातीचा फायदा कमी कर्जाच्या रूपाने ग्राहकांपर्यंत बँकांनी पाेहोचवावा, अशी अपेक्षा उद्याेगांनी केली अाहे.

व्याजदरात किमान अर्धा टक्क्याने कपात हाेण्याची अपेक्षा हाेती, असे मत सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. डीएलएफचे पूर्णवेळ संचालक राजीव तलवार म्हणाले की, अाता बँकांनी त्याचा लाभ मागणीत वाढ हाेण्याच्या दृष्टीने द्यावा. गृहकर्जावरील व्याजदर ९ ते ९.५ टक्के असणे गरजेचे अाहे. क्रेडाई या संस्थेचे अध्यक्ष गेटांबर अानंद यांनी व्याजदर कपातीचे पाऊल चांगले असल्याचे मत व्यक्त केले.