आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Housing.com ने सीईओ, को-फाऊंडर राहुल यादव यांना केले बरखास्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सोशल मीडियावर काही आठवड्यांपूर्वी 'शेअर वाटा चॅलेंज' देऊन चर्चेत आलेले प्रॉपर्टी बेवसाईट Housing.com चे माजी सीईओ आणि को-फाऊंडर राहुल यादव यांना त्यांच्या कंपनीनेच बरखास्त केले आहे. Housing.com मध्ये सर्वांत मोठी गुंतवणूक करणारी सॉफ्ट बॅंकेच्या वकीलांनी बोर्ड मिटिंगपूर्वी पोलिसांना बोलविले. बरखास्त केल्याने नाराज राहुल यादव गोंधळ घालण्याची शक्यता होती. पण त्यांनी कंपनीचा निर्णय शांतपणे ऐकून घेतला. कंपनीतून गुपचुप बाहेर पडले.
कंपनीची भूमिका
Housing.com आणि राहुल यादव यांच्या संबंधात गेल्या काही दिवसांपासून कटुता आली होती. काल झालेल्या मिटिंगनंतर कंपनीने सांगितले, की गुंतवणुकदार, भागिदार आणि मिडियात माहिती देण्यावरुन राहुल यांचे वागणे आक्षेपार्ह होते. त्यांच्या बरखास्तीमागे हेच कारण आहे.
विकले जाऊ शकते Housing.com
Quikr.com ही वेबसाईट Housing.com ला विकत घेण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
200 कोटी रुपयांचे शेअर्स 2251 कर्मचाऱ्यांची केली होती घोषणा
2012 मध्ये राहुल यादव यांनी आयआयटीमधून पदवी घेतली आहे. त्यांनी 200 कोटी रुपयांचे शेअर कंपनीच्या 2251 कर्मचाऱ्यांना देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी इतरही ऑनलाईन कंपन्यांच्या सीईओंना असे करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे राहुल यादव चर्चेत आले होते.
राहुल यांनी राजिनाम्यात लिहिले- बोर्डवर काम करण्याची लायकी नाही
राहुल यादव यांनी मे मध्येच राजिनामा देण्याची घोषणा केली होती. माझी संपूर्ण टीम कोणतेही लॉजिकल काम करण्याच्या लायक नाही. मला अशा टीमसोबत वेळ घालवायचा नाही, असेही त्यांनी राजिनाम्यात लिहिले आहे. त्यांनी लिहिले होते, की मी आणखी सात दिवस येथे आहे. या पदांवर नवीन नियुक्त्या होईपर्यंत मी थांबणार आहे. मी जोपर्यंत या पदांवर आहे, तोपर्यंत तुम्ही मला मदत करा. माझ्या आयुष्यात आता केवळ 3 लाख तास आहेत. मला हा कालावधी अशा टीमसोबत वेस्ट करायचा नाही. अशा स्वरुपाचा राजिनामा दिल्यानंतर राहुल यांनी तो परत घेतला होता. त्यानंतर काही दिवसांनी पु्न्हा राजिनामा दिला होता.
राहुल यांचे कंपनीत किती शेअर्स होते?
राहुल यांच्याकडे housing.com ची होल्डिंग कंपनी Locon Solutions चे 4.57% शेअर्स आहेत. त्यांनी 2012 मध्ये या वेबसाईटची स्थापना केली होती. आयआयटी मुंबईच्या चार मित्रांसोबत त्यांनी ही कंपनी सुरु केली होती. यातील तिघांनी आधीच कंपनी सोडली आहे. housing.com ने आतापर्यंत 760 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे. या वेबसाईटची मार्केट व्हॅल्यू 1500 कोटी रुपये आहे.
काय होते शेअर वाटा चॅलेंज?
राहुल यादव यांचे शेअर वाटा चॅलेंजची सोशल मीडियावर खुप चर्चा झाली होती. आइस बकेट आणि राइस बकेट चॅलेंजच्या धर्तीवर त्यांनी मेमध्ये एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यांच्या पोस्टला दोन हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या होत्या. तीनशे पेक्षा जास्त लोकांनी ती शेअर केली होती. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले होते, की आता मी जोमॅटोचे दिपेंदर गोयल आणि ओला कॅबचे भावेश अग्रवाल यांना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या कंपनीतील त्यांचे शेअर कर्मचाऱ्यांना वाटावे. मला विश्वास आहे, की ते दोघे या नॉमिनेशला समोर नेतील. या पोस्टला गांभिर्याने न घेता अनेकांनी राहुल यांच्यावर टीका केली होती.
भावेश अग्रवाल म्हणाले, गिव्ह दॅट मॅन अ कुकी
ऑनलाईन रेस्तरॉं गाईड जोमॅटो वेबसाईटचे सीईओ आणि राहुल यांचे मित्र दिपेंदर गोयल यांनी उत्तर देताना लिहिले होते, की आ, सो क्यूट. भावेश अग्रवाल यांनी उत्तर दिले होते, की गिव्ह दॅट मॅन अ कुकी. दोघांनी अशा स्वरुपाची उत्तरे दिल्यानंतर राहुल यांच्यावर होणारी टिका कैकपटीने वाढली.