आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! बाजारात खपवली तब्बल 50 कोटींची नकली नाणी, अशी करायचा स्मार्ट फसवणूक...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नकली नाण्यांचा धंदा करणाऱ्या एका गँगने खूपच स्मार्ट पद्धतीने भारतात 50 कोटींची नकली नाणी खपवली. पोलिसांनी या गँगचा भंडाफोड करत सुमारे 8500 रुपये किमतीचे 5 आणि 10 चे बनावट नाणे जप्त केले आहेत. पोलिसांनी हरियाणाच्या कुंडली येथून या धंद्याचा मास्टरमाइंड उपकार लुथराला अटक केली आहे. तो खूप धूर्तपणे नेपाळमधून त्याची गँग चालवायचा. लुथराने आपल्या बिझनेसला दिल्लीशिवाय राजस्थान आणि हरियाणापर्यंत पसरवले होते आणि असे काम करण्यासाठी इतरांना मशिनरीही पुरवू लागला होता. त्याने तब्बल 10 ठिकाणी नकली नाणे बनवण्याची चक्क फॅक्ट्रीच टाकली होती.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, कसा बनला नकली नाण्यांचा सौदागर
बातम्या आणखी आहेत...