आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयडीएफसी बँक आणि श्रीराम कॅपिटल विलीनीकरणावर सहमती...तर 12 महिन्‍यात निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- खासगी क्षेत्रातील आयडीएफसी बँक आणि श्रीराम समूहाची होल्डिंग कंपनी श्रीराम कॅपिटल विलीनीकरणासाठी सहमत झाले आहेत. या विलीनीकरणातून जी बँक अस्तित्वात येईल ती देशातील सर्वात मोठ्या रिटेल बँकांमधील एक असेल. या बँकेचे मूल्य ६५,००० कोटी रुपयांपर्यंत असू शकते. दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर शनिवारी श्रीराम कॅपिटलचे अध्यक्ष अजय पिरामल यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कंपनीच्या व्यवस्थापकांनी विलीनीकरणाची शक्यता तपासण्यासाठी ९० दिवसांचा वेळ दिला आहे. त्यानंतर शेअर स्वॅप रेशिओबाबत निर्णय घेण्यात येईल.
 
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स आणि श्रीराम सिटी युनियन फायनान्स समूहाच्या लिस्टेड कंपन्या आहेत. अनलिस्टेड कंपनीमध्ये लाइफ आणि जनरल इन्शुरन्स कंपनी आयडीएफसीसोबत विलीन होऊ शकतील, ज्याची अायडीएफसी बँकेमध्ये ५२.८६ टक्के भागीदारी आहे. आयडीएफसी बँकेने ऑक्टोबर २०१५ पासून काम करण्यास सुरुवात केली होती. बॅलेन्सशीटच्या दृष्टीने ही देशातील सात खासगी बँकांमधील एक आहे.
 
दुसरीकडे, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स देशातील व्यावसायिक वाहनांना आर्थिक साहाय्य देणारी सर्वात मोठी कंपनी आहे. श्रीराम सिटी युनियन फायनान्स गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जाच्या क्षेत्रात अग्रणी आहे. या दोन्ही कंपन्या श्रीराम कॅपिटलच्या वतीने चालवल्या जातात. अध्यक्ष अजय पिरामल यांनी २०१५ मध्ये ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. पिरामल एंटरप्रायझेसच्या श्रीराम कॅपिटल मध्ये २० टक्के आणि श्रीराम टान्सपोर्ट आणि श्रीराम सिटी युनियन फायनान्समध्ये १०-१० टक्के भागीदारी आहे.

...तर १२ महिन्यात प्रक्रिया पूर्ण
पिरामल यांनी सांगितले की, “श्रीराम ट्रान्सपोर्ट एक स्वतंत्र कंपनी म्हणून कायम राहील, तर श्रीराम सिटी युनियन फायनान्ससह समूहाच्या इतर सर्व कंपन्या बँकेत मर्ज होतील. आयडीएफसी बँकेचे राजीव लाल यांनी सर्व मंजुऱ्या वेळेवर मिळाल्यास १२ महिन्यांत ही विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यामुळे एकीकडे आयडीएफसी बँकेच्या शाखांची संख्या वाढून सुमारे १००० पर्यंत जाईल, तर दुसरीकडे श्रीराम कॅपिटलला आणखी मालमत्ता मिळतील.
 
बातम्या आणखी आहेत...