आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच्चे तेल ६० डॉलरवर गेल्यास समस्येत वाढ - सिन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा एकदा वाढत आहेत. सध्या ते अकरा महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर म्हणजेच ५२ डॉलर प्रतिबॅरलच्या जवळपास आहे. अशा स्थितीत कच्चे तेल ६० डॉलर प्रतिबॅरलच्या दरम्यान राहिल्यास महागाई आणि आर्थिक परिस्थितीवर त्याचा फारसा परिणाम दिसणार नसल्याचे मत सरकारने व्यक्त केले आहे. मात्र, त्याचे दर वाढले तर पेट्रोल आणि डिझेल महागण्याची शक्यता आहे. आयात खर्च वाढल्याने सरकारी तोटा वाढून जीडीपी विकास दरातदेखील घट होईल.

अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी एका मुलाखतीदरम्यान ही चिंता व्यक्त केली आहे. सध्या असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नसल्याचे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले होते. मात्र, यात जास्त वाढ झाल्यास अर्थव्यवस्था तसेच महागाईवर त्याचा परिणाम होईल, असेही ते म्हणाले होते.

याआधी जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे भारताला फायदा झाला आहे. आयातीवरील खर्च कमी होऊन महागाई कमी होण्यास मदत मिळाली होती. मात्र, गेल्या पाच महिन्यात कच्चे तेल ७० टक्के महागले आहे. जागतिक बँकेनेदेखील या वर्षी कच्चे तेल सरासरी ३७ डॉलर प्रतिबॅरल राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, सुधारित अंदाजानुसार यात वाढ करून कच्चे तेल सरासरी ४१ डाॅलर प्रतिबॅरल राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

खर्च अर्धा झाला
२०१५-१६ मध्ये ६३.९६ अब्ज डॉलरचे कच्चे तेल आयात झाले, जे २०१३-१४ मध्ये ११२.७ अब्ज डॉलर आणि २०१२-१३ मध्ये १४३ अब्ज डॉलर होते. या वर्षी ४८ डाॅलर किंमत असल्याने ६६ अब्ज डाॅलर खर्च होण्याचा अंदाज आहे.

सरकारचा फायदा
२०१४ च्या दुसऱ्या सहामाहीपासून कच्च्या तेलाचे दर सलग कमी होत आहेत. सरकारने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी ९ वेळा पेट्रोलवर अबकारी शुल्कात ११.७७ रुपये आणि डिझेलवर १३.४७ रुपये प्रतिलिटर वाढ केली आहे.

पेट्रोल-डिझेल महाग
जानेवारीच्या मध्यात कच्चे तेल १३ वर्षांच्या नीचांकी पातळवीर, २६ डाॅलरपर्यंत गेले हाेते. तेव्हापासून यात ७० टक्के वाढ झाली आहे. मार्चपासून पेट्रोल ८.९९ रुपयांपर्यंत वाढले आहे. डिझेल ९.७९ रुपये महागले आहे.
बातम्या आणखी आहेत...