आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इन्फ्रा’ सुधारले नाही तर ‘मेक इन’ फेल, स्टँडर्ड अँड पुअर्सचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर - सरकारच्या वतीने “मेक इन इंडिया’चा कितीही प्रचार करण्यात आला तरीदेखील आधी इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास केल्याशिवाय हा उपक्रम यशस्वी होणार नाही, असे मत जागतिक गुणांकन देणारी संस्था “स्टँडर्ड अँड पुअर्स’ने व्यक्त केले आहे.

कंपन्यांमध्ये कामकाजात सुधारणा ही इन्फास्ट्रक्चरवर अवलंबून आहे. जर इन्फ्रामध्ये विकास झाला तर पोलाद, सिमेंट, ऑटो आणि रिअल इस्टेटसह अनेक क्षेत्र तेजीने विकास करतील. भारतीय कंपन्यांसमोर जास्त व्याजदराची समस्यादेखील आहे. व्याजदर जास्त असल्याने कंपन्यांना कर्ज घेण्यात अडचणी येतात, त्यांच्यावर आर्थिक दबाव पडतो, असेही संस्थेच्या वतीने
जाहीर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कमजोर इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळेच भारताच्या जीडीपीमध्ये ५ टक्क्यांचे नुकसान होत असल्याचे “स्टँडर्ड अँड पुअर्स’चे तज्ज्ञ संशोधक अभिषेक डांगरा यांनी सांगितले. यामुळे निर्यातीत भारतीय कंपन्यांची स्पर्धा देण्याची क्षमतादेखील कमी होते. इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासात एक रुपया खर्च झाला तर त्यामुळे जीडीपीमध्ये दाेन रुपयांची वाढ होत असल्याचे डांगरा यांनी सांगितले. सरकारच्या वतीने इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करण्यात येत असला तरी त्यामुळे सरकारचा घाटा वाढण्याची शंका वाटत असल्याचे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेला खासगी गुंतवणुकीची आवश्यकता आहे. भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात कंपन्या चांगले प्रदर्शन करत असल्याचे मतही संस्थेने व्यक्त केले आहे.

११ ते १३ % कर्जवाढ
मंद औद्योगिक सुधारणांमुळे बँकांना दोन वर्षांपर्यंत कर्ज वसुलीत अडचण येऊ शकते. यामुळे नफा कमी होईल, कर्ज देण्याची क्षमतादेखील कमी होईल. २०१६-१७ मध्ये कर्जात ११ ते १३ टक्के वाढ होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...