आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हालाही मिळू शकते 16 लाखांचे पॅकेज, ग्रॅज्युएट असाल तर या देशात नोकरी करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- Keidanren business lobby group ने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे, की जपानमध्ये ग्रॅज्युएट करणाऱ्याला वार्षीक २५ हजार डॉलरचे (१६ लाख रुपये) पॅकेज मिळते. भारताच्या तुलनेत बघितले तर ही एक मोठी रक्कम आहे. मासिक पातळीवर बघायचे झाल्यास ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुमारे २.१३ लाख येन म्हणजेच १८८५ डॉलर प्रति महिना सॅलरी मिळते. भारतीय रुपयांमध्ये याला कनव्हर्ट केल्यावर मासिक सॅलरी १.२२ लाख रुपये होते.

 

ब्लूमबर्गच्या रिपोर्ट प्रमाणे, जापानचा विचार केला तर हे पॅकेज अत्यंत कमी आहे. त्यामुळे तेथील कंपन्या कर्मचाऱ्यांना १.१० लाख येन म्हणजेच ६३ हजार रुपये प्रति महिना अतिरिक्त अलाऊन्स देते. यात ट्रान्सपोर्ट अलाऊन्स आणि सब्सिडी सारखे अलाऊन्सही सामिल आहेत.

 

भारतीयांसाठी संधी
विशेष म्हणजे भारतीयांना जपानमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. जपानने भारतीय तरुणांना संधी देण्याची तयारी दर्शवली आहे.  मोदी सरकारने ऑन जॉब ट्रेनिंगसाठी ३ लाख तरुणांना जापानमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. कौशल विकास योजने अंतर्गत तरुणांना ३ ते ५ वर्षांसाठी जापानमध्ये पाठवले जाईल. त्यानंतर या कालावधीत तरुण मोठमोठ्या उद्योगांमध्ये काम करतील. नवीन तंत्रज्ञान शिकतील. याची सगळी तयारी करण्यात आली आहे. याचा खर्चही जापान सरकार उचलणार आहे.

 

पुढील स्लाईडवर वाचा... तुम्हाला कशी मिळू शकते संधी....

बातम्या आणखी आहेत...