आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Andarsul Onion Gets 4 Thousand 300 Rupee Quintal

अंदरसूलला कांदा चार हजार ३०० रुपये क्विंटल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये उत्तम प्रतीच्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने दरात वाढ होऊन मंगळवारी अंदरसूल बाजार समितीमध्ये या हंगामातील आतापर्यंत सर्वाधिक ४ हजार ३०० रुपये क्विंटल विक्री झाला आहे, तर पिंपळगाव, लासलगाव बाजार समितीमध्ये ४ हजारांपर्यंत दर गेला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही चांगल्या प्रतीचा कांदा ४० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. तसेच आवक घटत राहिली तर किरकोळ बाजारात येत्या दोन दिवसांत कांदा ५५ रुपये किलो दराने विक्री होण्याचा अंदाज आहे.

यावर्षी गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान झाल्याने सुमारे चाळीस टक्के कांदा हा जूनमध्येच विक्री झाला होता. त्यानंतर काही प्रमाणात वाचलेला कांदा टिकला, परंतु सध्याच्या वातावरणामुळे खराब होत असल्याने बाजारात आवक कमी झाली आहे. त्या तुलनेत दिल्ली, पंजाब, कोलकाता, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून मागणी वाढल्याने दरात वाढ होत आहे.
सध्याच्या ढगाळ आणि पावसाळी हवामानामुळे वातावरणातील आर्द्रता ८५ ते ९० टक्क्यांच्या दरम्यान असल्याने कांदा खराब होत आहे. त्यामुळे ज्या कांदा उत्पादकांकडे चांगल्या प्रतीचा कांदा आहे त्या कांद्यांनाच अधिक दर मिळत आहे.