आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Income Limitation On Saving, Investment Will Extend

बचत, गुंतवणुकीवर आयकर मर्यादेत वाढीची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यानुसार बचत आणि गुंतवणुकीवर मिळणारी सुटीची मर्यादा वाढण्याची शक्यता आहे. सध्या सरकार व्यावसायिक करावर लक्ष केंद्रित करत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे, तरी देखील ८० सी, ८० डी, एचआरए, मुलांच्या शिक्षणावरील करातील सुटीची मर्यादा वाढण्याची शक्यता आहे. गृहकर्जावरील व्याजावर सुटीची मर्यादादेखील वाढू शकते, सध्या ही दोन लाख रुपये आहे. ८० सीमध्ये सुटीची मर्यादा सध्या १.५ लाख रुपये आहे. यामध्ये जीवन विमा प्रीमियम, पीपीएफ, एनएससी, युलिप, ईएलएसएस, एफडी, ट्युशन फीस, गृहकर्ज ईएमआयमध्ये मुद्दलचा समावेश आहे. बचतीसाठी नव्या उत्पादनाची घोषणाही होऊ शकते. नवी उत्पादने व बचत मर्यादा वाढवल्याने सरकारला दुहेरी फायदा होऊ शकतो. एकतर करातील उत्पन्न कमी होणार नाही, दुसरीकडे लोकांच्या बचतीचा वापर ते गुंतवणूक वाढवण्यासाठी करू शकतील.
असोचेमने सर्वसामान्य नागरिकांमध्ये सर्व्हे केला.

यात लोकांच्या मागण्या आहेत -
>आयकर सूट मर्यादा २.५ लाख रुपयांवरून चार लाख रुपये करण्यात यावी.
>मेडिकल रिइम्बर्समेंट आणि मेडिक्लेमची मर्यादा १५ हजारांवरून ५० हजार रुपये करा.
>'लिव्ह इनकॅशमेंट' मर्यादा ३ लाखांवरून वाढवून १० लाख रुपये करावी.
>महिन्याकाठी शिक्षण भत्ता १,००० रुपये आणि होस्टेल खर्च भत्ता ३,००० रुपये करावा.
पुढे वाचा... रेल्वे कर्मचाऱ्यांचे भत्ते कपात होणार