आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल क्रांतीत भारत सुपरफास्ट, माेबाइल वापरणाऱ्यांची संख्या १०० काेटींवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात माेबाइल वापरणाऱ्यांची संख्या १०० काेटींवर गेली असून त्यातील ३० काेटी ग्राहक हे स्मार्ट फाेनधारक अाहेत. भारतात ४० काेटी लाेकांकडे इंटरनेटची सुविधा अाहे, तर ९५ टक्के लाेकांकडे अाधार कार्ड अाहे. हा वेग सुपरफास्ट असून भारताचा प्रवास डिजिटलायझेशनच्या दिशेने हाेत असल्याचे केंद्रीय माहिती संचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
फेसबुक, गुगल व स्मार्ट फाेन्सच्या वापरामध्ये अमेरिकेनंतर भारताचा नंबर लागताे अाहे. देशातल्या १ लाख ५५ हजार पोस्ट आॅफिसेसच्या माध्यमातून भारत सरकार लवकरच डिजिटल क्रांतीच्या नव्या उच्चांकाचा झेंडा रोवण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्या वर्षात पाेस्टाच्या पार्सल विभागाचा महसूल ३७ टक्क्यांनी वाढला अाहे. ई - कॉमर्स डिलिव्हरीमध्ये टपाल िवभाग सध्या १ हजार कोटींचा व्यापार करत आहे. येणाऱ्या काळात ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून महत्त्वाचे कामकाज करणे सोपे होणार आहे. एलपीजी गॅसच्या सबसिडीची रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करणे, हे त्या दिशेने पडलेले पहिले पाऊल असल्याची माहिती प्रसाद यांनी दिली. देशाच्या कानाकाेपऱ्यात इंटरनेट सुविधा पाेहोचली तर डिजिटल क्रांतीच्या व्यापक विस्तारासाठी मदत हाेणार अाहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी यासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना दिलेल्या अाहेत. संपुअा सरकारच्या काळात देशभरात ३५८ कि.मी. अाॅप्टिकल फायबर लाइन अंथरली गेली. माेदी सरकारच्या कालावधीत ८५ हजार ६५३ किलोमीटर्स लाइन अंथरण्याचा टप्पा गाठला. केरळ, चंदिगड व पुडुचेरीत हे काम पूर्ण झाले आहे.

"हँडसेट डिव्हाइस' :
टपाल मंत्रालय प्रत्येक पोस्टमनच्या हाती लवकरच एक हँडसेट डिव्हाइस देत आहे. डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित हे डिव्हाइस असेल. या माध्यमातून विविध प्रकारच्या डाक सेवा, पोस्टाची तिकिटे, इतकेच नव्हे, तर बँकिंग सेवाही ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचवता येणार अाहेत. त्याशिवाय १९० शहरात बीपीओ व कॉल सेंटर्स सुरू करण्याचीही योजना आहे.