आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपलसाठीही भारतीय बाजारपेठ ‘चमकता सितारा’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगातील सर्वात माेठी कंपनी अॅपल भारतात आयफोनची विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भारतात स्मार्टफोनची वाढलेली विक्री आणि अमेरिकेसह इतर मोठ्या देशांत विक्री कमी झाल्यानंतर कंपनीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर तिमाहीमध्ये भारतात आयफोनची विक्री ७६ टक्क्यांनी वाढली, तर दुसरीकडे, जगभरात आयफोनच्या विक्रीत फक्त ०.४ टक्के वाढ झाली. भारतातील महसुलात ३८ टक्के वाढ झाली असून एकूण महसुलात फक्त २ टक्क्यांची वाढ झाली. यासंदर्भात भारतात शोरूम सुरू करण्यासाठी अॅपलने भारत सरकारला प्रस्तावदेखील पाठवला आहे.

अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी सांगितले की, ब्रिक्स देशांत सर्वात तेजीने भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे. चीन आणि अमेरिकेनंतर भारतात तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन बाजार आहे.
भारतीयांचे सरासरी वय २७ वर्षे अाहे. देशातील अर्ध्यापेक्षा जास्त नागरिक २५ वर्षांच्या आतील आहेत. ग्राहकीसाठी ही सर्वात चांगली बाब अाहे. विशेष करून येथील नागरिकांना सर्वश्रेष्ठ उत्पादन हवे आहे.
चीनचे नुकसान भरणार नाही
चीनमध्ये सुरू असलेली आर्थिक मंदी पाहता कंपनीला येथील विक्री कमी होण्याची शक्यता वाटत आहे. वास्तविक चीनमधील नुकसान भारतात भरून निघणे अवघड आहे. चीनमध्ये अॅपलने २०१५ मध्ये प्रत्येक तिमाहीत सुमारे १.५ कोटी अायफोन विकले, तर याच काळात भारतात सुमारे ४.५ लाख फोनची विक्री झाली. म्हणजेच भारताच्या तुलनेत चीनमधील आयफोन बाजार ३३ टक्के मोठा आहे. भारतात ७० टक्क्यांपेक्षा जास्त स्मार्टफोन दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे असतात, त्यामुळे येथे मोठी संधी नाही.

दररोज दोन लाखांपेक्षा जास्त आयफोनची विक्री :
डिसेंबर २०१५ तिमाहीमध्ये अॅपलने ७.४८ कोटी आयफोनची विक्री केली. म्हणजेच दररोज २,०४,९३१ आणि प्रत्येक तासाला ८,५३८ आयफोनची विक्री झाली. हा विक्रीचा सर्वोच्च आकडा असला तरी डिसेंबर २०१४ च्या तुलनेत ७.४५ पेक्षा फक्त ०.४ टक्के जास्त आहे. २००७ नंतर विक्रीतील ही सर्वात कमी वाढ आहे. यादरम्यान आयपॅडची विक्री २१ टक्के, तर आयमॅकची ४ टक्क्यांची घटली आहे.

१३ वर्षांत पहिल्यांदाच उत्पन्न कमी होण्याची शक्यता
जानेवारी-मार्च २०१६ तिमाहीमध्ये अॅपलचा नफा कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून हे १३ वर्षांत पहिल्यांदा घडले आहे. या तिमाहीतील महसूल ५० ते ५३ अब्ज डॉलरपर्यंत राहण्याचा कंपनीचा अंदाज आहे. जानेवारी २०१५ मध्ये महसूल ५८ अब्ज डॉलर होता. यादरम्यान ६.१२ कोटींच्या तुलनेत फक्त ४.५ ते ५ कोटी आयफोन विक्रीचा अंदाज आहे. पुढील काळात आर्थिक सुस्तीचा अंदाज असल्याचे मत सीएफओ लुका मसेराती यांनी वक्त केले. डॉलरच्या मजबुतीमुळेदेखील पाच अब्ज डॉलरचे नुकसान झाले असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर कंपन्यांची भागिदारी,,, अॅपलचे निकाल...