आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Oil Company Became The Winner Of The Most Profit

इंडियन ऑइल ठरली आहे सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिलायन्स इंडस्ट्रीजला जून तिमाहीतही सर्वात जास्त नफा कमावणारी कंपनी बनण्याचा बहुमान मिळालेला नाही. या वेळीदेखील इंडियन ऑइलने त्यांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. एप्रिल ते जून २०१५ मध्ये इंडियन आॅइलला ६,४३६ काेटी रुपयांचा, तर रिलायन्सला ६,३१८ कोटी रुपयांचा नफा झाला.
मार्चच्या तिमाहीत इंडियन आॅइल रिलायन्सपेक्षा खूप कमी अंतराने पुढे होती. त्या वेळी इंडियन ऑइलला ६,२८५ कोटी तर रिलायन्सला ६,२४३ कोटींचा नफा झाला होता. याआधी ऑक्टोबर-डिसेंबर २०१४ मध्ये टीसीएसने रिलायन्सपेक्षा जास्त नफा मिळवला होता. त्या वेळी टीसीएचा नफा ५,७११ कोटी, तर टीसीएसचा ५,४८९ कोटी रुपये नफा होता. त्याआधी रिलायन्स सलग २३ वर्षांपासून रिलायन्स ही सर्वात जास्त नफा कमावणारी कंपनी होती. इंडियन ऑइल आणि रिलायन्सची आकडेवारी पाहिली तर या दोन्ही कंपन्यांना कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्यामुळे फायदा झाला आहे. यामुळे या कंपन्यांचा शुद्धता करण्यातील नफा वाढला आहे. रिलायन्सला १०.४ डॉलर प्रतिबॅरल तर इंडियन ऑइलला १०.७७ डॉलर प्रतिबॅरलचा नफा झाला.