आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादन पीएमआय चार महिन्यांच्या नीचांकावर, मंदीचा परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील उत्पादन क्षेत्रातील हालचाली (अॅक्टिव्हिटी) या वर्षी चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. नवीन ऑर्डर नसल्याने उत्पादन अॅक्टिव्हिटीमध्ये घट झाली आहे. मार्च महिन्यात या आकडेवारीत वाढ नोंदवण्यात आली होती. उत्पादनात आलेल्या या मंदीमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेवर व्याजदरात घट करण्याचा दबाव वाढला आहे. निक्केई भारत उत्पादन खरेदी निर्देशांक (पीएमआय) एप्रिलमध्ये ५०.५ वर आला असून तो मार्चमध्ये ५२.४ होता. हा निर्देशांक उत्पादन क्षेत्रातील गती दर्शवतो. हा निर्देशांक ५० च्या वर असल्यास उत्पादन क्षेत्रातील हालचालींत वाढ होत असल्याचे दिसून येते. हा निर्देशांक ५० वर कायम असल्यास स्थिरता समजते आणि ५० च्या खाली आल्यास नकारात्मक घट मानली जाते.

मंदीचा इशारा
भारतातील पीएमआय निर्देशांक उत्पादन क्षेत्रात मंदी असल्याकडे इशारा करत असल्याचे मत निक्केईचा अहवाल तयार करणारी संस्था मार्किटचे अर्थतज्ज्ञ पाॅलियाना डी लीमा यांनी व्यक्त केले.

मंदीची कारणे
- देशांतर्गत ऑर्डर स्थिर असून विदेशातून मिळणाऱ्या ऑर्डरमध्ये सहा महिन्यांपासून मंदी आहे.
- कच्च्या मालाचा साठा वाढला असून तयार मालाचा साठा कमी झाला आहे.
- कच्च्या मालाचे पैसे जमा झाले नाहीत तर पुरवठ्यात अडचणी अाल्या.
- कंपन्यांची कॉस्ट ११ महिन्यांत सर्वात तेजीने वाढली आहे.
- उत्पादनातील पाचपैकी चार क्षेत्रांतील मंदीत वाढ नोंदवण्यात आली.

कोअर क्षेत्रातील वाढ उच्चांकावर
मार्च महिन्यात आठ कोअर क्षेत्रांतील वाढ ६.४ टक्क्यांच्या आकड्यासह १६ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. ही वाढ रिफायनरी, फर्टिलायझर आणि सिमेंट उत्पादनातील वाढीमुळे झाली आहे. कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक गॅस, रिफायनरी उत्पादने, फर्टिलायझर, स्टील, सिमेंट आणि इलेक्ट्रिसिटी क्षेत्रात भारताच्या एकूण आैद्योगिक उत्पादनात ३८ टक्के भागीदारी आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात यात ०.७ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली होती. नोव्हेंबर २०१४ मध्ये ६.७ टक्के होती.
बातम्या आणखी आहेत...