आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांदळाची निर्यात २० टक्क्यांनी घटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुरवठ्यावर अालेला ताण अाणि देशातील वाढती मागणी यामुळे पुढील वर्षात तांदळाची निर्यात २० टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज फूड अँड अॅग्रिकल्चर या संस्थेने व्यक्त केला अाहे. चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतातून यंदाच्या वर्षात १० दशलक्ष टन तांदळाची िनर्यात हाेण्याचा अंदाज अाहे.

देशातील तांदळाची मागणी वाढत असली तरी त्याप्रमाणात पुरवठा नाही. त्यामुळे देशातील गरज लक्षात घेता पुढील वर्षात भारत वगळता सर्व िनर्यातदार सज्ज हाेतील. परिणामी भारताच्या तांदूळ िनर्यातीमध्ये २० टक्क्यांनी घट हाेण्याची शक्यता ‘एफएअाे’ या संघटनेच्या जगभरातील पीक परिस्थिती अहवालात व्यक्त केली अाहे. भारतातून हाेणारी कमी िनर्यात थायलंड अाणि व्हिएतनाम या देशांकडून वाढलेल्या िनर्यातीतून भागवली जाईल. यंदाच्या वर्षात भारतात १०३.५ दशलक्ष टन तांदूळ हाेण्याची शक्यता अाहे. जागतिक पातळीवर तांदळाचे उत्पादन कमी हाेण्याचा अंदाज अाहे.