आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठी एव्हिएशन डील : इंडिगोने 250 एयरबससाठी दिले 25 अब्‍ज डॉलरची अाॅर्डर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- देशातील सर्वात मोठी एयरक्राफ्ट डिलमध्‍ये इंडिगो कंपनीने सोमवारी 250 ए320 निओ (न्‍यू इंजिन ऑप्‍शन) एयरक्राफ्ट्स खरेदीसाठी ऑर्डर दिली आहे. युरोपीयन मॅन्‍युफॅक्‍चर एअरबस विमानाच्‍या प्राइझ लिस्‍टमध्‍ये 250 एयरक्राफ्ट्सची एकूण किंमत जवळपास 25.5 अब्‍ज डॉलर्स आहे.
इंडिगोने शनिवारी एयरबससोबत एयरक्राफ्ट खरेदीचा व्‍यवहार केला. यापूर्वी जगात सर्वात मोठी एयरक्राफ्ट खरेदी अॉर्डर गुरगाव येथील इंडिगो कंपनीने ऑक्‍टोंबर 2014 मध्‍ये 250 ए-320 नि‍आे वि‍मान खरेदीसाठी एमओयुवर सह्या केल्‍या होत्‍या. एयरक्राफ्ट खरेदी प्राइझ लिस्‍टमध्‍ये या विमानांची किंमत जवळपास 25.5 अब्‍ज डॉलर म्‍हणजे 1.55 लाख कोटी रूपये आहे.
यापूर्वी दिलेल्‍या अॉर्डर
इंडिगो कंपनीने 2005 मध्‍ये 100 ए- 320 निओ विमानांची ऑर्डर दिली होती. या ऑर्डरची किंमत 11 अब्‍ज डॉलर होती. ती त्‍यावेळची सर्वात मोठी ऑर्डर होती. इंडिगो कंपनीने 2005 मध्‍ाील ऑर्डर नंतर 100 एअरबस ए 320 विमानांची डिलिव्‍हरी मिळालेली आहे. आतापर्यंत इंडिगोने सध्‍याच्‍या खरेदीसह एकूण 530 ए320 फॅमिली एयरक्राफ्टची ऑर्डर केली ,असल्‍याचे एयरलाइनने सांगितले अाहे.
पुढील स्‍लाईडमध्‍ये वाचा इंडिगोच्‍या स्‍वस्‍त विमान प्रवास आश्‍वासनाविषयी...