आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडस्ट्रियल काॅरिडाॅरच्या विकासाला मिळणार वेग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अाैद्याेगिक मार्गिका अर्थात इंडस्ट्रियल काॅरिडाॅरच्या विकासाला अाणखी गती देण्यासाठी राष्ट्रीय अाैद्याेगिक मार्गिका विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा सरकारचा विचार अाहे. त्यासाठी वाणिज्य अाणि उद्याेग मंत्रालय लवकरच मंत्रिमंडळाकडून मान्यता मिळवणार अाहे.
जागतिक केंद्र म्हणून प्राेजेक्ट इंडियाला चालना तसेच उत्पादन क्षेत्राला गतिमान करण्यासाठी केंद्र सरकार देशभरात काॅरिडाॅरचे जाळे विणणार अाहे. अाैद्याेगिक धाेरण अाणि प्राेत्साहन खात्याकडून प्राधिकरणाची स्थापना करण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ मंत्रालयीन अधिका-याने सांगितले.

काॅरिडॉरची संकल्पना
>दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडाॅर
>बंगळुरू-मुंबई इकाॅनाॅमिक काॅरिडाॅर
>चेन्नई-बंगळुरू इंडस्ट्रियल काॅरिडाॅर
>विशाखापट्टणम-चेन्नई इंडस्ट्रियल काॅरिडाॅर
>अमृतसर-काेलकाता इंडस्ट्रियल काॅरिडाॅर

डीएमअायसीअंतर्गत येणारी सहा राज्ये
उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र.

बीएमईसीअंतर्गत येणारी राज्ये कर्नाटक, महाराष्ट्र.

सीबीअायसीअंतर्गत येणारी राज्ये तामिळनाडू, कर्नाटक, अांध्र प्रदेश.

प्राधिकरण ही कामे करणार
कामाचा वेग वाढावा आणि समन्वय राहावा यासाठी तयार करण्यात येणारे प्राधिकरण प्रकल्प विकास कामकाज, प्रकल्प मूल्यांकन अाणि मंजुरी, अंमलबजाणी, इंडस्ट्रियल काॅरिडाॅर विकासासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येणा-या सर्व प्रयत्नांमध्ये समन्वय साधणे ही कामे करणार आहे.

काॅरिडाॅर अंमलबजावणीच्या टप्प्यावर
हे पाचही काॅरिडाॅर अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अाहेत. डीएमअायसीअंतर्गत पाच स्मार्ट शहरे उभारण्याचे काम हाती घेण्यात अाली असून जपान इंटरनॅशनल काॅर्पाेरेशन एजन्सीच्या अभ्यास पथकाने चेन्नई-बंगळुरू इंडस्ट्रियल काॅरिडाॅरच्या सर्वसमावेशक एकात्मिक बृहत अाराखड्याचा प्राथमिक अभ्यास करण्यास प्रारंभ केला अाहे. रस्ते विकास, मलनिस्सारण, िपण्याचे पाणी, पाणी प्रक्रिया अादी विविध पायाभूत प्रकल्प डीएमअायसीअंतर्गत विकसित करण्यात येणार अाहेत.