नवी दिल्ली - उत्पादन आणि ग्राहकोपयाेगी वस्तूमध्ये चांगली स्थिती असल्यामुळे देशाच्या आैद्योगिक उत्पादनात सलग दुसऱ्या महिन्यात तेजी दिसून आली आहे. औद्योगिक उलाढालींना मोजणारा औद्योगिक उत्पादन सूचकांक (आयआयपी) जुलैमध्ये ४.२ टक्के नोंदवण्यात आला आहे. तसे पाहिले तर जूनमध्ये संशोधन करण्यात आलेल्या ४.३६ टक्के या आकड्यापेक्षा हे कमीच आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात आयआयपीची वाढ ०.९० टक्के होती.
सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात एप्रिल आणि जुलै तिमाहीमध्ये आयआयपी ३.५ टक्के नांेदवण्यात आला आहे. गेल्या वर्षी जे ३.६ टक्के होते. सूचकांकामध्ये जवळपास ७५ टक्के हिस्सा असलेल्या उत्पादन क्षेत्रातीत हालचालींत जुलै मध्ये ४.७ टक्के गती वाढली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात यामध्ये ०.३ टक्के पडझड नोंदवण्यात आली होती.
गुंतवणुकीचे पॅरामीटर अशी ओळख असलेल्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनात जुलैमध्ये १०.६ टक्के इतका महत्त्वपूर्ण दर वाढला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये यात टक्क्यांची पडझड नोंदवण्यात आली होती. खनन क्षेत्राचीदेखील १.३ टक्के गती वाढली आहे. गेल्या महिन्यात यामधील गती ही ०.१ टक्के होती. वीज उत्पादन क्षेत्रातील गती मात्र, मंदी झाली असून ३.५ टक्के झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या क्षेत्राची गती ११.४ टक्क्यांनी वाढली होती. उद्योगांच्या दृष्टीने विचार केल्यास २२ पैकी १२ उद्योग क्षेत्रांमधील उत्पादनात सकारात्मक वाढ नोंदवण्यात आली आहे.
चालू खाता घाट्यातदेखील घट
देशातीलचालू खाता घाटा (कॅड) चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत घटून ६.२ अब्ज डॉलरवर आला आहे. हा जीडीपीच्या १.२ टक्क्यांच्या बरोबरीत आहे. एका वर्षाच्या समान तिमाहीमध्ये तो ७.८ अब्ज डॉलर (जीडीपीच्या १.६ टक्के) च्या बरोबरीत होता. सेवा क्षेत्रातील निर्यात होणारे उत्पन्न वाढल्यामुळेच कॅड कमी होण्यास मदत झाली आहे. कंपनीमध्ये बनवलेल्या वस्तूंच्या व्यापार घाट्यांमध्ये कमी आल्यामुळेच ही वाढ झाली असल्याचे मत रिझर्व्ह बँकेने व्यक्त केले आहे. यात ३४.६ अब्ज डॉलरने घट होऊन ३४.२ अब्ज डॉलर राहिले आहे. या व्यतिरिक्त सेवामध्ये उत्पन्नात झालेली वाढ, नफा, लाभांश आणि व्याजामुळे उत्पन्न वाढल्यानेही घाटा कमी झाला आहे.