आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी सलग दुसऱ्या महिन्यात नकारात्मक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्पादन क्षेत्रातील काही सुधारणांमुळे ऑगस्ट महिन्यात औद्योगिक उत्पादनात सुधारणा झाली आहे. ऑगस्ट महिन्यात आयआयपी विकास दरात उणे २.४ च्या तुलनेत वाढीसह उणे ०.७ नोंदवण्यात आला आहे. आयआयपी विकास दरात वाढ नोंदवण्यात आली असली तरी हा अजूनही नकारात्मक झोनमध्ये आहे. जुलै महिन्यात आयआयपीमध्ये उत्पादन क्षेत्रातील घसरणीमुळे २.४ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात उत्पादन क्षेत्रातील विकास उणे ३.४ च्या तुलनेत ०.३ टक्के नोंदवण्यात आला आहे. सरकारच्या वतीने सोमवारी यासंबंधीची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यानुसार उत्पादन क्षेत्रात जुलै महिन्याच्या तुलनेत सुधारणा झाली आहे. ऑगस्ट महिन्यात उत्पादन क्षेत्रातील विकास दर ०.३ टक्के राहिला, जुलै महिन्यात हा उणे ३.४ टक्के होता. टिकाऊ वस्तूंच्या विकास दरात २.९ टक्क्यांच्या तुलनेत ३.२ टक्के विकास दर नोंदवण्यात आला आहे. तर ऑगस्ट महिन्यात भांडवली वस्तूंमध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसून आली असली तरीदेखील या क्षेत्रातील विकास दर नकारात्मक झाेनमध्ये राहिला. भांडवली वस्तूंमध्ये जुलै महिन्यात नोंदवण्यात आलेल्या उणे २९ टक्क्यांच्या तुलनेत विकास दर उणे २२.२ टक्के झाला.

खाण क्षेत्रात घसरण
खनन क्षेत्रातील उत्पादनाला सर्वात मोठा झटका बसला आहे. जुलै महिन्याच्या ०.८ टक्क्यांच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात या क्षेत्रात उणे ५.६ टक्के विकास दर नोंदवण्यात आला, तर इलेक्ट्रिसिटी क्षेत्रातही १.६ टक्क्यांच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात ०.१ टक्के नोंदवण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...