आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील औद्योगिक उत्पादन वाढले पाच वर्षांत सर्वाधिक गतीने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील औद्योगिक उत्पादन पाच वर्षांत सर्वात जास्त गतीने वाढले आहे. सणाच्या कालावधीत ग्राहकोपयोगी उत्पादने आणि भांडवली वस्तू क्षेत्राने चांगले प्रदर्शन केले. त्यामुळे औद्योगिक उत्पादन सूचकांक (आयआयपी) आॅक्टोबरमध्ये ९.८ टक्के नोंदवण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये ३.८४ टक्के होता. गेल्या वर्षी आक्टोबरमध्ये यात २.७ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली होती.

आयआयपीमध्ये ७५ टक्क्यांची भागीदारी असलेले उत्पादन क्षेत्र आॅक्टोबरमध्ये १०.६ टक्क्यांनी वाढले आहे. ऊर्जा क्षेत्रात ९ टक्के आणि खनन क्षेत्रात ४.७ टक्क्यांच्या गतीने वाढ नोंदवण्यात आली. ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये ४२.२ टक्क्यांची वाढ झाली. भांडवली वस्तूंमध्ये १६.१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. उद्योगांचा विचार केल्यास उत्पादन क्षेत्रातील एकूण २२ पैकी १७ उद्योग समूहामध्ये आॅक्टोबर २०१५ च्या दरम्यान सकारात्मक वाढ नोंदवण्यात आली आहे.
निर्यात वाढावी
औद्योगिक वाढिमुळे दिलासा मिळाला. आता िनर्यात क्षेत्रात अशी वाढ होणे आवश्यक आहे, असे मत ईईपीसी, अभियांत्रिकी निर्यातदार संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
या क्षेत्रात वाढ
उद्योग क्षेत्र वाढ
जेम्स अँड ज्वेलरी ३७२.५%
फर्निचर १३८.९%
साखर मशिनरी १०३.४%
मोबाइल फोन आदी ६१.५%
ऑफिस मशिनरी ४८.४%
रेडिआे, टीव्ही ४७.५%
अँटिबायोटिक्स ३८.५%
पॅसेंजर कार २१.४%
बातम्या आणखी आहेत...