मुंबई - देशातील औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी "इज ऑफ डुइंग बिझनेस' एक मंत्र आहे. या माध्यमातूनच औद्योगिक विकासाला गती मिळत असून उद्योग उभारण्यासाठीची प्रक्रिया सुलभ झाली आहे, असा दावा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला. मुंबईतील हॉटेल ताजमध्ये फिक्की (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री) आणि वर्ल्ड एटीए कार्नेट काैन्सिल (डब्ल्यूएटीएसी) च्या वतीने ‘कस्टम्स आणि व्यावसायिक समाजापुढील आव्हाने’ या विषयावर आयोजित परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ हा औद्योगिक विकासाचा मंत्र असून केंद्र आणि राज्य शासन औद्योगिक विकासासाठी या माध्यमातून औद्योगिकीकरणाला अधिक गती देण्याचा प्रयत्न करत आहेत. याच धर्तीवर राज्यात उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या विविध ७६ परवानग्यांची संख्या कमी करून ३७ वर आणली असल्याचे देसाई यांनी सांगितले.