आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅमेझॉनचा धमाका: TV, लॅपटॉप, हेडफोनवर मिळेल 70% डिस्काउंट, 9 ते 12 ऑगस्टपर्यंत सेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन सेल सुरू होत आहे. यात मोबाइल, लॅपटॉप, टीव्हीसोबतच किचन अप्लायन्सेसवर 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येणार आहे. कंपनीने कोणत्या प्रोडक्टवर किती डिस्काउंट मिळेल याची माहिती दिली. लिनोव्होचा Z2 Plus वर तब्बल 8 हजार रुपयांचे डिस्काउंट मिळेल.
 
 #9 ऑगस्टला रात्री 12 वाजेपासून सेल सुरू 
 - सेल 9 ऑगस्टला रात्री 12 पासून सुरू होणार असून 12 ऑगस्टला रात्री 11.59 पर्यंत चालेल. अॅमेझॉनच्या प्राइम मेंबर्सना ऑफरला लवकर मिळतील. पे बॅलेन्सवरून शॉपिंग केल्यास 15 टक्के कॅशबॅक मिळेल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून शॉपिंग केल्यासही कॅशबॅक मिळेल. एसबीआय युजर्सला मोबाइल अॅपवरून शॉपिंग करता येईल. यावरून 15 टक्के आणि वेबसाइटवरून शॉपिंग केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळेल.
 
 #सॅमसंगपासून ते रँगलरपर्यँत
 -अॅमेझॉनच्या माहितीनुसार, सर्व ईमेल गिफ्ट कार्ड्सवर 5 टक्के कॅशबॅक देण्यात येईल. याशिवाय बुक मायशो, क्लिअरट्रिप आणि पेंटालून्सवरील गिफ्ट कार्ड्सवर 20 टक्के कॅशबॅक मिळू शकते. अॅमेझॉन द ग्रेट इंडियन सेलदरम्यान अॅप्पल, वन प्लस, सॅमसंग, यूसीबी, प्युमा, अदिदास, रँगलर, टायटन, मार्क्स अँड स्पेसर सारख्या ब्रँडवर खास सूट देण्यात येत आहे.
 
 #स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर 40% डिस्काउंट
 सॅमसंगच्या फोनवर 2 हजार रुपये, लिनोव्होवर 5 हजार रुपये, वन प्लसवर 2 हजार, आयफोनवर 35 टक्केपर्यंत, मोटोरोलावर 2 हजार, कुलपॅडवर 15 टक्के एवढे डिस्काउंट देण्यात येत आहे. 29,999 वाला OnePlus 3T 27 हजार 999 रुपयांत मिळेल. 19 हजार 999 रुपयांचा Lenovo Z2 Plus 12 हजार 164रुपयांत मिळेल. 16,999 रुपयांचा  Moto G5 Plus 15 हजार 999 रुपयांत मिळेल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कोणत्या प्रोडक्टवर किती डिस्काउंट मिळेल...
बातम्या आणखी आहेत...