आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! हा आहे देशातील पहिला इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रगण्य उद्योग समूह Escorts ने देशातील पहिला इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर लाँच केला. कंपनीने बुधवारी या ट्रॅक्टरची इलेक्ट्रॉनिक आणि हायड्रोस्टॅटिक संकल्पना देशासमोर आणली. एस्कॉर्टस कंपनीने या संशोधलाला एक्स्क्युजिव 2017 असे सांगितले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापुढील पायरी म्हणजे शेती आणि बांधकामाशी संबंधीत उपकरणे मिळतील. या नव्या संशोधनासाठी तब्बल 20 ते 30 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा कंपनीने केला आहे. 
 
पोर्टफालिओचा विस्तार
 
या नव्या उत्पादनासह कंपनीने एक्सपोर्ट आणि देशांतर्गत बाजारपेठेत फार्मट्रॅक आणि पावरट्रॅक अंतर्गत 22 एचपी ते 90 एचपीच्या श्रेणीतील पोर्टफालिओचा विस्तार केलेला आहे. एस्कॉर्टस आपल्या 43 आंतरराष्ट्रीय डिस्ट्रीब्युटर्सच्या माध्यमातून उत्पादनांची विक्री करते. 
नव्या उत्पादनांचे खास वैशिष्ट्य म्हणजे 70 ते 90 हॉर्स पावरचे न्यू एस्कॉर्ट ट्रॅक्टर सीरिज, 22 ते 30 एचपीच्या रेंजमध्ये कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर, बीएस 4 मानांकसह सीआरडीआय इंजिनलेस केबिन असलेले ट्रॅक्टर असे आहे. 
 
या इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टरचा आम्हाला अभिमान आहे
 
हे ट्रॅक्टर बाजारपेठेत सादर करतांना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक निखिल नंदा म्हणाले, की कंपनीला इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर लाँच करतांना गर्व होत आहे. प्रगतीशील शेतकरी डोळ्यासमोर ठेवून आम्ही ट्रॅक्टरमध्ये तांत्रिक बदल मोठ्या प्रमाणात केले आहे. आमच्या दर्जेदार अभियांत्रिकीचा हा उत्कृष्ट नमुना आहे. हा नवा ट्रॅक्टर वापरणाऱ्यांना चांगला अनुभव देईल, असा विश्वास आहे. 
बातम्या आणखी आहेत...