Home »Business »Industries» He Earns Over 6 Crore Monthly After Quitting 22 Years Of Job

22 वर्षांनी नोकरी सोडून सुरु केला बिझनेस, आता महिन्याकाठी कमावतोय 6.5 कोटी

नवी दिल्ली - प्रत्येकाच्या मनात काही ना काही नवे करण्याची इच्छा मनात दडलेली असते. काहींची ही इच्छा पूर्ण होते, तर काहींच

दिव्य मराठी वेब टीम | Sep 22, 2017, 12:12 PM IST

नवी दिल्ली - प्रत्येकाच्या मनात काही ना काही नवे करण्याची इच्छा मनात दडलेली असते. काहींची ही इच्छा पूर्ण होते, तर काहींची इच्छा अर्धवटच राहतात. बिहार येथील मुजफ्फरनगर येथे राहणारे पुर्णेंद शेखर यांनी तब्बल 22 वर्षे नोकरी केली. त्यानंतर नोकरी सोडून स्वत:चा बिझनेस सुरु करण्याचे स्वप्न साकारले. त्यांनी फक्त स्वत:चा बिझनेस सुरु केला नाही, तर आता प्रत्येक महिन्याला 6.5 कोटी रुपयांची कमाई करताहेत.
42 वर्षीय पुर्णेंद यांनी सांगितले की, 22 वर्षे मी नेव्हीमध्ये नोकरी केली. मात्र, स्वत:चा उद्योग सुरु करण्याची इच्छा प्रबळ होती. अखेर मे 2016 मध्ये चांगला पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचवर्षी डिसेंबरमध्ये कोगोपोर्ट नावाची एक लॉजिस्टीक कंपनी सुरु केली.
8 बाय 8 फुट ऑफिसमध्ये झाली सुरवात
पुर्णेंद यांनी सांगितले की, 1995 मध्ये 22 व्या वर्षी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीला सुरवात केली. यादरम्यान मला प्रशिक्षणार्थी म्हणून 40 हजार रुपये पगार मिळायचा. त्यानंतर 22 वर्षापर्यंत हा प्रवास अथकपणे सुरुच होता. 22 वर्षे नोकरी केल्यानंतर लॉजिस्टीक व्यवसायाची सुरवात 8 बाय 8 फुटातून केली.
पुढील स्लाईडवर वाचा - किती जमवला फंड

Next Article

Recommended