नवी दिल्ली - रामनाथ कोविंद देशाचे 14 वे राष्ट्रपती असतील. राष्ट्रपतिपदासाठी एनडीएचे उमेदवार कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत होती. तथापि, मतांच्या संख्येनुसार कोविंद यांचीच राष्ट्रपतिपदासाठी वर्णी लागली. कोविंद यांना निवडणुकीत 65.65 टक्के मते मिळाली. देशाच्या संवैधानिक प्रमुखांना दर महिन्याला 1.5 लाख रुपये वेतन तसेच अनेक सुविधा मिळतात. वेजइंडिकेटर फाउंडेशनच्या रिपोर्टनुसार भारताच्या राष्ट्रपतींची सॅलरी चीन आणि पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांहून जास्त आहे.
सोर्स:- paywizard.org(जगभरातील टॉप 10 राष्ट्राध्यक्षांना 2017 मध्ये मिळणारी सॅलरी)
भारत
राष्ट्रपती - रामनाथ कोविंद
जन्म - 1 ऑक्टोबर 1945 (यूपी, भारत)
वेतन :
वार्षिक - 18,18,700 रुपये (29,980 डॉलर)
मासिक - 1,51,580 रुपये (2,332 डॉलर)
साप्ताहिक - 34,970 रुपये (538 डॉलर)
दरदिवशी - 5005 रुपये (77 डॉलर)
तथापि, राष्ट्रपतींची सॅलरी 1.5 लाख रुपयांहून वाढवून 5 लाख रुपये मासिक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या शिफारशीला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांना दर महिन्याला किती मिळते सॅलरी...