Home »Business »Industries» Rajgopal Used To Wash Dishes And Now He Has His Own Chain Of Restaurants Business

कधीकाळी हॉटेलमध्ये करायचे भांडे धुण्याचे काम, आज आहे 50 पेक्षा अधिक रेस्टॉरंटचे मालक

दिव्य मराठी वेब टीम | Sep 22, 2017, 00:05 AM IST

नवी दिल्ली -अडचणींचा डोंगर समोर असल्यास व्यक्ती संघर्ष करायला शिकतो. हे म्हणणे खरे करून दाखविले आहे पी राजगोपाल यांनी. इच्छा असूनसुद्धा त्यांना सातवीमध्येच शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागले.
तामिळनाडूच्या तूतीकोरन जिल्ह्यातील पानियाडू गावातील राजगोपाल यांनी काम शोधण्यासाठी शहराकडे धाव घेतली. तेव्हाच त्यांच्या संघर्षाला सुरवात झाली होती. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि राहण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये साफसफाईचे काम सुरु केले.
अशी सुचली शॉपची आयडिया
यादरम्यान राजगोपाल यांनी चहा तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी एका किराणा दुकानात काम करण्यास सुरवात केली. याठिकाणी राजगोपाल यांना स्वत:चे शॉप सुरु करण्याची आयडिया सुचली. त्यांनी चेन्नई येथील के के नगर परिसरात याची सुरवात केली.
पुढील स्लाईडवर वाचा - राजगोपाल यांनी कशी सुरवात केली रेस्टॉरंट व्यवसायाची

Next Article

Recommended