आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानींनी साजरी केली एक दिवस अगोदर दिवाळी, गुंतवणूकदारांनी कमावले 27000 कोटी रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिवाळीच्या एक दिवसपूर्वी रिलायन्स इंडस्ट्री आणि त्यांच्या गुंतवणूकदारांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. बुधवारी शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने 900 रुपये प्रति शेअरचा भाव पार केला. दरम्यान, एकाच दिवसात रिलायन्सच्या शेअरमध्ये 4.5 टक्के वाढ झाली. या वाढीसह रिलायन्स शेअरचा भाव 917 रुपये पोहोचला. यादरम्यान रिलायन्स मार्केट कॅप 581178 कोटी रुपयांवर पोहोचले. एकीकडे गुंतवणूकदारांची चांदी झाली, तर दुसरीकडे कंपनीच्या संपत्तीत तब्बल 27000 कोटी रुपयांची भर पडली. 
 
मंगळवारी रिलायन्सच्या शेअरचे भाव 874 रुपयावर पोहोचले होते. बुधवारी शेअर बाजार सुरु झाल्यानंतर 4.5 टक्के भाव वधारून 917 रुपयांवर पोहोचला. मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 553918 इतके होते. ते 27000 कोटी रुपयांनी वाढून 581178 रुपयांवर पोहोचले. गुंतवणूकदारांना एकाच दिवसात 27000 कोटी रुपयांचा नफा झाला.
 
पाच दिवसात 48172 कोटींनी वाढली संपत्ती
12 ऑक्टोबरला रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरचा भाव 841 रुपये होता. त्यात सातत्याने वाढ होऊन अवघ्या पाच दिवसांत शेअरचे भाव 917 रुपयांपवर पोहोचले. त्यामुळे रिलायन्स कंपनीच्या संपत्तीत 48172 कोटी रुपयांची भर पडली. 
 
जियो कंपनीला झाला 270 कोटी रुपयांचा तोटा 
दुसऱ्या तिमाहीत टेलिकॉम कंपनी रिलायन्स जियोचा तोटा वाढून 271 कोटी रुपये मागील तिमाहीत कंपनीला 21 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. यादरम्यान जिओचे एकूण उत्पन्न 6150 कोटी रुपये होते. 30 सप्टेंबर 2017 पर्यंत जियोचे 13.86 कोटी ग्राहक होते. 
बातम्या आणखी आहेत...