नवी दिल्ली - चीनसह जगभरातील कंपन्यांना भारतीय बाजारपेठा आकर्षित करतात. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय बाजारपेठांतून चांगला नफा कमावता येतो, हे यामागचे रहस्य आहे. त्याशिवाय जगाच्या पाठीवर भारतासारखे दुसरे कुठलेही मोठे मार्केट नाही. या कारणामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक श्रीमंत असलेल्या जेफ बेजोसला भारताच्या मार्केटचा बादशाह होण्याची इच्छा आहे.
कोण आहे जेफ बेजोस ?
अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचा फाऊंडर असून जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंती व्यक्ती आहे. यावर्षी जुलै महिन्यात काही वेळासाठी बेजोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरला होता.
26 अब्ज डॉलरचे मार्केट
भारतातील ई-कॉमर्सचे मार्केट तब्ब्ल 26 अब्ज डॉलरचे अर्थात 1.7 लाख कोटी रुपयांचे आहे. भारतातील ऑनलाईन बाजारपेठ 2019-20 मध्ये 6.8 लाख कोटींवर पोहोचण्याशी शक्यता वर्तविली जात आहे. या कंपनीचे भारतात एकूण 41 फुलफिलमेंट सेंटर आहेत. अॅमेझॉनला टक्कर देऊ शकणाऱ्या फ्लिपकार्ट आणि स्नॅपडिल या दोन कंपन्या आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा - काय आहे पहिली स्ट्रॅटेजी