आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझेल प्रति लीटर 95 पैशांनी महागले, पेट्रोल दरात वाढ नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरात डिझेल प्रति लीटर 95 पैशांनी महाग झाला आहे. गुरुवारी(ता.15) रात्री प्रति लीटर डिझेलसाठी दिल्लीत 44 रुपये 95 पैशांऐवजी आता 45 रुपये 90 पैसे मोजावी लागतील. मात्र पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ नाही. यापूर्वी 20 सप्टेंबर रोजी सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचा दर 50 पैशांनी वाढवला होता. तेव्हाही पेट्रोलच्या दरात वाढ झाली नाही.
मेट्रो शहरातील डिझेलचे नवे दर
शहर सध्‍याचे दर नवे दर
दिल्‍ली
44.95
45.90
कोलकाता
48.71
49.52
मुंबई
52.08

53.09

चेन्‍नई
46.08

47.07

* दर प्रति लीटर रुपये.
कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ
मागील दोन आठवड्यांमध्‍ये आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाली आहे. 1 ऑक्टोबरला ब्रेंट क्रूड ऑईलचे दर 46 रुपये 69 डॉलर प्रति बॅरल झाले होते. हेच दर 9 ऑक्टोबर रोजी 50 रुपये प्रति बॅरलवर पोहोचले आहे.