आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयकर कर्मचाऱ्याचे आंदोलन सुरू, पदोन्नती, रिक्त पदांवर नियुक्तीची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून आंदोलन सुरू केले आहे. सध्या त्यांनी कामाची गती कमी केली असून व्हेरिफिकेशन आणि स्कूटनीचे काम बंद करण्यात आले आहे. तसेच वरिष्ठांना माहिती देणे बंद करण्यात आले आहे. मागण्या माण्य झाल्या नाही तर ८ ऑक्टोबरला पूर्ण दिवस काम बंदचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पदोन्नती, रिक्त जागांवर नियुक्त्या आणि काम करण्यासाठी चांगल्या सुविधा देण्याची मागणी या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
आयकर कर्मचाऱ्यांच्या दोन संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. यामध्ये "इनकम टॅक्स एम्प्लाॅई फेडरेशन' आणि "इनकम अॅक्स गॅझेटेड ऑफिसर्स असोएिशन'चा समावेश आहे. या दोन्ही संघटनांमध्ये विभागातील ९७ टक्के कर्मचारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. कर संकलनात याच संघटनांचे अधिकारी आणि कर्चाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येतात. उर्वरित तीन टक्के कर्मचारी हे आयआरएस असल्याचा दावा करण्यातआला आहे.

या आंदोलनाचा भाग म्हणून जास्तीत जास्त लोकांना करभरणा करण्याच्या मोहिमेमध्ये दोन्ही संघटनांचे कर्मचारी सहभागी होणार नसल्याचे गॅझेटेड ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय गोयल यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी २५ लाख नवीन करदाता जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. टॅक्स एम्प्लॉई फेडरेशनचे अध्यक्ष अशोक कनौजिया यांनी या मागण्यांसाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगितले.

एकीकडे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी)ने सरकारला या वर्षी एक कोटी नवे करदाते जोडण्याचे आश्वासन दिले आहे, तर दुसरीकडे विभागात २० हजारपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे कनौजिया यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांपासून पदोन्नती झालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. वरिष्ठ पातळीवरील आयआरएस अधिकाऱ्यांना अशी कोणतीच समस्या नसल्याचेही ते म्हणाले.