Home »Business »Industries» IT Department Penalty To Cairn Energy British Company

केअर्न एनर्जीला प्राप्तिकर विभागाची 30,700 कोटी दंड भरण्याची नोटीस

वृत्तसंस्था | Apr 21, 2017, 04:00 AM IST

  • केअर्न एनर्जीला प्राप्तिकर विभागाची 30,700 कोटी दंड भरण्याची नोटीस
नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने ब्रिटिश संस्था केअर्न एनर्जीला नवीन नोटीस पाठवली आहे. ही नोटीस ३०,७०० कोटी रुपयांच्या दंडाची आहे. देशाच्या इतिहासातील ही सर्वात मोठ्या दंडाची नोटीस असण्याची शक्यता आहे.
विभागाने कंपनीला आधी १०,२४७ कोटी रुपये भांडवली लाभ कराची (कॅपिटल गेन्स) नोटीस पाठवली होती. ही रक्कम भरण्यात आली नसल्याने तिप्पट दंड आकारण्यात आला आहे. प्राप्तिकर लवादाने ९ मार्च रोजी १०,२४७ कोटी रुपयांच्या रेट्रोस्पेक्टिव्ह (आधीच्या तारखेपासून) कर योग्य असल्याचा निकाल दिला होता, मात्र आधीच्या तारखेपासून व्याज लावण्यास मनाई केली होती.

या संबंधी लवादाने व्याज घेण्यास मनाई केली असून दंड घेण्यासही मनाई केली असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळेच दंडाची नवीन नोटीस देण्यात आली आहे. प्राप्तिकर कायद्यामध्ये १०० टक्के ते ३०० टक्क्यांपर्यंत दंडाची तरतूद आहे. कारणे दाखवा नोटिसीप्रमाणेच ही नोटीस असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. लवादाच्या आदेशाच्या सहा महिन्यांच्या आत विभागाला दंड लावण्याचा अधिकार आहे. या आधी २४ जानेवारी २०१४ रोजी विभागाने ड्राफ्ट असेसमेंट ऑर्डर जारी केली. असेसमेंट जानेवारी २०१६ पूर्ण झाले.

२००७ मध्ये संपत्ती हस्तांतर प्रकरण
केअर्न एनर्जीने २००६ मध्ये आपली भारतीय उपकंपनी केअर्न इंडियाला येथील सर्व संपत्ती हस्तांतरित केली होती. हा कर याच संपत्तीच्या हस्तांतरासंबंधित आहे. केअर्न एनर्जीने जानेवारी २००७ मध्ये भारतीय उपकंपनीला शेअर बाजारात लिस्ट केले होते. त्या नंतर २०११ मध्ये ही कंपनी वेदांताला विकली. मात्र, त्याचे ९.८ टक्के शेअर स्वत:जवळ ठेवले. ड्राफ्ट असेसमेंट नंतर प्राप्तिकर विभागाने या विक्रीवर बंदी घातली आहे.

केअर्न इंडिया ‘नेक्स्ट ५०’ निर्देशांकातून बाहेर
बीएसई सेन्सेक्सच्या ‘नेक्स्ट ५०’ निर्देशांकातून २६ एप्रिल रोजी केअर्न इंडिया आणि युनायटेड स्पिरिट्सला काढण्यात येणार आहे. त्यांची जागा पेट्रोनेट एलएनजी आणि हॅव्हेल्स इंडिया घेतील. बीएसईच्या वतीने परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. या निर्देशांकात सेन्सेक्स - ५० च्या बाहेरील ५० प्रमुख कंपन्यांचा समावेश असतो. वेदांतामध्ये केअर्न इंडियाच्या विलीनीकरणानंतर यातील ट्रेडिंग थांबवण्यात आली आहे.

दायित्व ४,८७५ कोटींच्या अॅसेटवर: केअर्न
केअर्नने शेअरधारकांना सूचनेमध्ये की, कंपनी असेसमेंटचा विरोध करणार आहे. कर देण्याचे दायित्व केवळ भारतातील अॅसेटवर बनते. ३१ डिसेंबर २०१६ रोजी या अॅसेटचे मूल्य ७५ कोटी डॉलर (४,८७५ कोटी रुपये) होते.

Next Article

Recommended