आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियम उल्लंघनप्रकरणी जिग्नेश शहा अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी एफटीआयएल आणि कमोडिटी एक्स्चेंज एमसीएम्स-एसएक्सचे संचालक जिग्नेश शहा यांना अटक केली आहे. एमसीएक्स-एसएक्सला एका खासगी स्टॉक एक्स्चेंजच्या स्वरूपात एक्स्टेन्शन देण्यासाठी सेबीसोबत धोका तसेच वास्तव लपवून नियमांचे उल्लंघन करण्याचा आरोप सीबीआयने शहा यांच्यावर लावला आहे.

यासंबंधी दोन खासगी कंपन्यांच्या संचालकांना आम्ही ताब्यात घेतले असून त्यांच्या मुंबईमधील नऊ ठिकाणांवर छापेमारी केली अाहे, अशी माहिती सीबीआयचे प्रवक्ते आर. के. गौर यांनी दिली. छापेमारी करण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये त्यांच्या दोन राहत्या घरांचाही समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. शहा यांच्या निवासस्थानाबरोबरच सेबीच्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवरही छापेमारी करण्यात आली आहे.

छापेमारीदरम्यान खासगी कंपन्यांचे शेअर ट्रान्सफर, एफडीआर, मालमत्तांची खरेदी इत्यादी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पुढील चौकशीसाठी या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. एमसीएक्स-एसएक्सने बाजार नियामक सेबीसोबत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादानंतर २०१३ मध्ये कामाला सुरुवात केली होती. सेबीने वर्ष २००८ मध्ये स्टॉक एक्स्चेंजला चलन डेरिव्हेटिव्हचे ट्रेडिंग करण्यास मंजुरी दिली होती.

सेबी अधिकाऱ्यांचीही चौकशी
सेबीच्या अधिकाऱ्यांमध्ये कार्यकारी संचालक मुरलीधर राव, डीजीएम राजेश दंगेती, एजीएम विशाखा मोरे आणि सेबीचे माजी कार्यकारी संचालक जे. एन. गुप्ता यांचा समावेश आहे. या प्रकरणात दोन वर्षांपूर्वीच एफआयआर दाखल करण्यात आला होता. एमसीएक्स-एसएक्सने सेबीसोबत अनेक दिवसांच्या वादानंतर २०१३ मध्ये स्टॉक्स एक्स्चेंज म्हणून काम करायला सुरुवात केली होती.
बातम्या आणखी आहेत...