आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमधील व्हिझहिनजम पोर्टसाठी अपसेझलाे "लेटर ऑफ अवॉर्ड'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - अदानी पोर्टस अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लि. (अपसेझ) या देशातील बंदर विकास क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीला तसेच जागतिक स्तरावर कार्यरत असेलल्या अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपनीला केरळ सरकारकडून व्हिझहिनजम इंटरनॅशनल डीपवॉटर सीपोर्ट प्रकल्पाच्या विकासासाठी लेटर ऑफ अवॉर्ड मिळाले आहे. देशातील पहिले खोल पाण्यातील मल्टी कार्गो पोर्ट व खोल पाण्यातील पहिले ट्रान्सशिपमेंट (एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर माल चढवणे)बंदर केरळात साकारत आहे. त्यासाठी या निविदा मागवण्यात आल्या होत्या.
सध्या कोलंबोसारख्या विदेशी बंदरातून भारतीय कार्गोचे अंदाजे एक दशलक्ष टीईयूचे ट्रान्सशिपमेंट होते. व्हिझहिनजम पोर्टच्या विकासामुळे भारतीय व्यापाऱ्यांच्या पैशांची बचत होणार आहे. याबाबत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी
सांगितले,‘या प्रकल्पात सहभागाचा आनंद आहे. देशातील हे खोल पाण्यातील पहिले मल्टी कार्गो पोर्ट आहे. हे ठिकाण अत्यंत मोक्याचे असून येथून आंतरराष्ट्रीय जलमार्ग जवळ असल्याचेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...