आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How A Lingerie Business Become A Million Dollar Business, Who\'s Behind This

ज्या कामाची आईला वाटत होती लाज, मुलीने उभा केला अब्जावधींचा बिझनेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महिलांनी एखादा बिझनेस उभा करणे सोपी गोष्ट नाही, त्यातही परिस्थिती अवघड तेव्हा होते, जेव्हा त्यांनी निवडलेले क्षेत्र हे काही वेगळे असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जिने व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा घरातूनच अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. ही महिला आहे रिचा कर. जिने ऑनलाइन अंडरगार्मेट्स विक्रीसाठी 'जिवामे' ची सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या आईने म्हटले होते, मी माझ्या मैत्रिणींना काय सांगणार, माझी मुलगी ब्रा-पँटी विकते ? आज त्याच मुलीने तिचा बिझनेस अब्जावधी रुपयांचा केला आहे. आम्ही या महिलेबद्दल आणि तिच्या बिझनेसबद्दल सांगणार आहोत...

मैत्रिणींना काय सांगणार, माझी मुलगी ब्रा-पँटी विकते
रिचा यांनी नव्या पद्धतीच्या उद्योगाला सुरुवात तर केली होती, मात्र त्यांच्या व्यवसायावर पहिला प्रश्न कुटुंबानेच उपस्थित केला होता. एका मीडिया रिपोर्टनुसार, रिचानेही मान्य केले होते, की तिच्या आईने रिचाच्या उद्योगाबद्दल साशंकात व्यक्त करत म्हटले होते, 'मी माझ्या मैत्रिणींना काय सांगणार, माझी मुलगी कॉम्प्यूटरवर ब्रा-पँटी विकते आहे.'

रिचा यांनी खंत व्यक्त करत म्हटले होते, माझे वडीलही तेव्हा मला समजू शकले नव्हते, मला काय करायचे आहे. सुरुवातीला लोक माझ्या उद्योगावर हसत होते, त्यांच्या प्रतिक्रिया खोडसाळ असायच्या.
पुढील स्लाइडमध्ये,
>> ऑफिससाठी जागा शोधताना आली अडचण
>> प्रत्येक मिनिटाला विकली जाते एक ब्रा
>> भारतात 12 हजार कोटींचे लांजरी मार्केट
>> 8 वर्षे नोकरी केल्यानंतर सुरु केला बिझनेस
>> फॉर्च्यूनच्या अंडर 40 उद्योगी महिलांमध्ये समावेश
>> चार वर्षात पाचपट व्यवसाय
>> गुंतवणूकदारांनी ओतले कोट्यवधी
>> असा होता बिझनेस मॉडेल