आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आंदाेलनाची िदशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एलबीटी रद्द करण्यासाठी व्यापाऱ्यांच्या उत्पन्नाला अाधार मानून वर्गवारी करून करमाफी िकंवा ५० काेटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना करातून सवलत देण्याचा िवचार सरकार करत असल्याची सध्या चर्चा सुरू अाहे. यासंदर्भात पुढील एक-दाेन िदवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यानंतर अांदाेलनाची िदशा ठरवण्याचा िनर्णय व्यापाऱ्यांनी घेतला अाहे.

स्थानिक स्वराज्य संस्था कर अर्थात एलबीटी एक अाॅगस्टपासून हटवण्याचे अाश्वासन राज्य सरकारने िदल्यानंतर समस्त व्यापारी वर्गाने सुटकेचा िन:श्वास साेडला हाेता; परंतु ५० काेटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना या करातून सवलत देण्याचे धाेरण सरकार अाणत असल्याबद्दल गेल्या काही िदवसांपासून कुजबुज सुरू अाहे. एलबीटी रद्द करताना व्यापाऱ्यांच्या उत्पन्नाला अाधार ठरवून वर्गवारी करून त्यानुसार कर्जमाफी देणे म्हणजे भेदभाव िनर्माण करून फूट पाडण्याचा प्रयत्न सरकार करत अाहे, या विचाराने व्यापारी वर्गात अस्वस्थता िनर्माण झाली अाहे. एक अाॅगस्टपासून राज्यातून एलबीटी रद्द करण्याचा शब्द फडणवीस सरकारने िदलेला असून त्यांनी पाळला पाहिजे. वर्तमानपत्रांत चर्चा सुरू असली तरी त्याबाबत अधिकृत माहिती अालेली नाही. एलबीटीबाबत काेणताही पर्याय िमळालेला नाही. सध्याच्या घडामाेडी लक्षात घेऊन अाम्ही एक ते दाेन िदवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून त्यानंतर मग अांदाेलनाची िदशा ठरवली जाईल, असे ‘फॅम’चे अध्यक्ष माेहन गुरनानी यांनी ‘िदव्य मराठी’ला माहिती देताना सांिगतले.

व्यापाऱ्यांची बैठक
एलबीटीरद्द हाेण्याची तारीख जवळ येत असताना अचानक सुरू झालेल्या या चर्चेच्या पार्श्वभूमीवर फेडरेशन अाॅफ असाेसिएशन अाॅफ महाराष्ट्र (फॅम)च्या मुंबईतील कार्यालयात बुधवारी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला एलबीटी लागू असलेल्या २५ महापालिकांतील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.
बातम्या आणखी आहेत...