आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifebuoy Campaign Catches Attention At Kumbh Mela

सिंहस्थ कुंभमेळ्यात असे केले जाते \'ब्रँडिंग\', चपात्यांवर केला होता Lifebuoyचा प्रचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः हे छायाचित्र 2013 मधील सिंहस्थ कुंभमेळ्यातील आहे. 'हिंदुस्तान यूनिलीवर'ने कंपनीने चपात्यांवर 'आपने लाइफब्वॉय से हाथ धोए क्‍या?' असे 'लाइफब्वॉय'चे ब्रॅंडिंग केले होते.)

महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याला प्रारंभ झाला आहे. लाखों भाविक तीन महिने गोदावरी नदीच्या काठावर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहेत. कुंभमेळ्यात फक्त देश-विदेशातील लोक येतात असे नाही तर देशातील अनेक कंपन्या देखील आपल्या प्रॉडक्टची मार्केटिंग करत असतात.
कुंभमेळ्यात देशातील दिग्गज कंपन्या आपल्या उत्पादनाचे ब्रँडिंग करत असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. मात्र, कुंभमेळ्यात ब्रँडिंग करण्‍याची त्यांची पद्धत निराळी असते. कोणी चपात्यांवर तर कोणी नदीवर तरंगणार्‍या बोटीवर आपले ब्रँडिंग करत असतात.
'लाइफब्वॉय'चे झाले होते चपातीवर ब्रॅंडिंग...
हिंदुस्तान यूनिलीवर कंपनीने 'मार्केटिंग'ची अनोखी पद्धत कुंभमेळ्यात वापरली होती. सुमारे 20.5 लाख चपात्या दुपारच्या जेवणात वाटल्या होत्या. या चपात्यांवर विशेष संदेश लिहिण्यात वाला होता. तो म्हणजे 'आपने लाइफब्वॉय से हाथ धोए क्‍या?'

कंपनीने यासाठी स्‍पेशल हीट स्‍टॅंप बनवून घेतला होता. अलाहाबादमध्ये 2013 साली झालेल्या कुंभमेळ्यादरम्यान कंपनीने आपल्या 'लाइफब्वॉय' साबणाचे अशा पद्धतीने ब्रॅंडिंग केले होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कुंभमेळ्यात आणखी कशा पद्धतीने ब्रॅंडिंग करतात कंपन्या?