आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिनन माझी लय भारी फॅशन : रितेश देशमुख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लिनन वस्त्रप्रावरणांमधील पहिलावहिला ब्रँड लिननकिंग आता महाराष्ट्रात ११ ठिकाणी उपलब्ध झाला आहे. लिननकिंगचा सदिच्छादूत अभिनेता रितेश देशमुखच्या हस्ते ब्रँड लाँच झाला. अलीकडच्या काळात कडक फॅशन म्हणून लिननकडे ग्राहकांचा ओढा वाढला असून मी स्वत: लिनन कपड्याचा मोठा चाहता असल्याचे रितेश या वेळी म्हणाला. विशेषत: तरुणांना हवा असणारा अभिरुचीसंपन्न सुखद अनुभव लिननकिंगमधील एका भेटीतच मिळू शकतो, असेही त्याने सांगितले. महाराष्ट्राच्या मातीत विकसित झालेला लिननकिंग ब्रँड आता देशभरात झपाट्याने विस्तारित होईल, अशी खात्रीदेखील त्याने नमूद केली. लिननकिंगचा विस्तार राज्याबरोबरच देशभरातील प्रमुख शहरांत करण्याचा विचार असल्याचे लिननकिंगचे संचालक कुणाल मराठे यांनी सांगितले. ठाण्यासोबतच सांगली व सोलापूर शहरामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन दालने सुरू होत आहेत. सध्या ११ दालने असून लवकरच ही संख्या २५ पर्यंत पोहोचवण्याचा मानस कुणाल मराठे यांनी बोलून दाखवला.