आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"एलएनजी' विकून जगात कतार आघाडीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या उत्पादनाचा योग्य प्रचार केला तर त्या देशाचे चित्रच पालटू शकते. याचे कतार उत्तम उदाहरण ठरलेले आहे. २० वर्षांपूर्वी या देशाची अर्थव्यवस्था मासळी उत्पादनावरच अवलंबून होती. आज हा देश इंधनावर खूप मोठा झाला आहे. कतारमध्ये नैसर्गिक गॅस(एलएनजी) निर्यात करतो. भारत, चीन आणि जपानसारखे देश त्याचे ग्राहक आहेत. पाश्चात्त्य देशांशी हा देश स्पर्धा करतो आहे. कतारने हे यश सहकारी कंपन्यांमुळे प्राप्त केले आहे. त्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी संयंत्रे वापरली आहेत.

स्टॅन्ले रीड, जागतिक अर्थव्यवस्थेचे तज्ज्ञ
उन्हाळ्यातील दिवसाची सकाळ, समुद्रातील जहाजावर ४० अंश सेल्सियसहून अधिक तापमान, अशा परिस्थितीत काही लोक पाइप जोडण्याचे काम करत आहेत. पाइप जोडल्यानंतर मशीनच्या साह्याने प्रेशर उघडले जाते. चेहऱ्यावर थंड हवेचा झोत येतो. ही थंड हवा "लिक्विड नॅचरल गॅस' (एलएनजी) हा पेट्रोलियम इंधनास पर्याय आहे. अनेक देशांत याचा वापर होतो आहे.

एलएनजीमुळे काही वर्षांत कतार ऊर्जेच्या क्षेत्रात बादशहा बनला आहे. नॅचरल गॅसच्या ज्या रूपात याला काढले जाते, तेव्हा याचे तापमान मायनस -१२६ अंश सेल्सियस असते. त्याला वेगवेगळ्या भागात विभागून लिक्विफाइड केले जाते. समुद्रातून पंपिंगद्वारे याला जहाजापर्यंत आणले जाते. कतारच्या समुद्रात एलएनजीचा मोठ्या प्रमाणावर साठा आहे. तेथील सरकारने यालाच प्रमुख व्यवसाय बनवले असून संपूर्ण लक्ष एलएनजीच्या संशोधनावर केंद्रित केले आहे. शेकडो जहाजे यावर काम करत आहेत. नॅचरल गॅसचे संशोधन आणि संयंत्रांवर अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केल्यानंतर आज कतार एलएनजीचा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे. त्याच्या अल रेकाय्यत जहाजाचे संचालन नेदरलँड्सची रॉयल डच शेल करते.
मासळी व्यवसायावर अवलंबून

२० वर्षांपूर्वी कतारची अर्थव्यवस्था मासे पकडणे आणि मोत्यांसाठी पाणबुडे वापरणे यावर अवलंबून होती.

आज एलएनजीच्या निर्यातदारांत सर्वात पुढे आहे. १९७० च्या दशकात डच शेल कंपनीने कतारमध्ये नॅचरल गॅसच्या साठ्याचा शोध लावला. तेव्हा नॅचरल गॅसचा व्यवसाय आजसारखा नव्हता. युरोपचे ग्राहकही दूर होते. कारण गॅसचा पुरवठा तेथे करणे शक्य नव्हते. यामुळे डच शेल कंपनी बाजूला झाली आणि प्रोजेक्ट थंड बस्त्यात गेला. कतार आणि त्याचे आमिर हमद बिन खलिफ अल थानी यांनी मलेशिया आणि इंडोनेशियाचे उदाहरण देऊन १९९० च्या दशकात एलएनजीचा प्रचार सुरू केला. यामुळे त्यांना गुंतवणूकदार मिळाले. कतार सरकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उद्योग एका नव्या उंचीवर नेला. त्यांनी कमी खर्चातून जास्त उत्पादन देणारी संयंत्रे बसवली. मार्केट रिसर्च फर्म आयएचएसच्या २०१४ च्या अहवालानुसार कतारने आपल्या बळावर जागतिक स्तरावर एक तृतीयांश एलएनजी निर्यात केले. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचीही हीच महत्त्वाकांक्षा होती.

२० वर्षांतील दृश्य : २० वर्षांपेक्षाही कमी कालावधीत कतार एलएनजीचा सर्वात मोठा निर्यातदार बनला. वर्ष २०१४ मध्ये ५ आशियाई देशांनी जागतिक निर्यातीच्या ७० टक्के एलएनजी आयात केली आहे. एलएनजीमुळे कतारला अत्याधिक फायदा झाला आहे. तो दर माणशी उत्पादनाच्या दृष्टीने सर्वाधिक उत्पन्न असणारा देश झाला आहे. कतारने २४ कोटी मेट्रिक टन एलएनजी दरवर्षी निर्यात केले आहे. यामुळे त्याला ११ हजार ३४० अब्ज रुपयांचा व्यवसाय मिळाला आहे.
आयएचएसचे प्रमुख गॅस स्ट्रॅटेजिस्ट मायकेल स्टॉपर्ड यांनी सांगितले, कतार एलएनजीचा मोठा निर्यातदार असून त्यांनी काही प्रकल्पही सुरू केले आहेत. मोठे जहाज आणून कमी वेळेत तो जास्त गॅस विक्री करतो आहे. कतारचा एलएनजीचा साठा दोहा या राजधानीच्या शहरापासून काही दूर अंतरावर असलेल्या "रास लफान' या कंपनीत आहे. कतार गॅस कंपनीचे एक्झिक्युटिव्ह इब्राहिम बावाजीर यांनी सांगितले, आम्ही कठोर निर्णय घेतले आणि व्यवसाय वाढवला. तसे केले नसते तर एलएनजीला या स्तरावर नेता आले नसते. आजही उत्पादन आणि पुरवठा क्षमतेच्या अाधारे कतारने एलएनजीचे भाव कमी ठेवले आहेत.

कतारची महत्त्वाकांक्षा अमेरिका आणि युरोपला गॅस विकण्याची आहे. परंतु उत्तर अमेरिकेत गॅसचे उत्पादन होत असल्याने ते शक्य झालेले नाही. यामुळेच कतार सर्वाधिक निर्यात चीन, भारत आणि दक्षिण कोरियासारख्या देशांना करतो आहे. या देशांपेक्षाही सर्वाधिक पुरवठा जपानला होतो आहे. त्यांची ऊर्जा संयंत्रे फुकुशिमाच्या अणुस्फोटानंतर आता नॅचरल गॅसवर चालतात.

आशिया खंडावर लक्ष केंद्रित करून कतार दुसऱ्या खंडांसोबत व्यापार करतो आहे. यामुळे सौदी अरेबिया, इराक आणि इराणसारख्या आखाती देशांचे लक्ष आशियाकडे वळले आहे. येथे ऊर्जा संयंत्रांसाठी इंधनाची मागणी वाढते आहे.

कतारची जागतिक भागीदारी
जागतिक स्तरावर एलएनजीचा व्यवसाय २४२.० मिलियन मेट्रिक टन आहे. यात कतारचा हिस्सा ७६.२ इतका आहे.

मुख्य निर्यातदार देश २०१४
मिलियन मेट्रिक टन एकूण भागीदारी
कतार ७६.६ ३१.६%
मलेशिया २५.० १०.३%
ऑस्ट्रेलिया २३.२ ०९.६%
नायजेरिया १९.४ ०८.४%
इंडोनेशिया १७.६ ०७.३%

मुख्य आयातदार देश २०१४
मिलियन मेट्रिक टन एकूण भागीदारी
जपान ८८.७ ३६.६%
दक्षिण कोरिया ३७.८ १५.६
चीन १९.८ ०८.२
भारत १४.५ ०६.०
तैवान १३.६ ५.६
(स्रोत : आयएचएस एनर्जी)