आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एम-कॉमर्स: ऑनलाइन विक्री ४० लाख कोटी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खरेदी करण्यासाठी ऑनलाइनचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच अॅपची संख्यादेखील वाढत आहे. यामुळे २०१८ पर्यंत मोबाइलने खरेदी होणा-या व्यवसायाची आकडेवारी ६३८ अब्ज डॉलर (जवळपास ४०,४७४ अब्ज रुपये) पर्यंत जाणार आहे.

उद्योग संघटना असोचेम आणि सर्वेक्षण करणारी संस्था डेलॉय यांच्या वतीने करण्यात आलेल्या संशोधन अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. विविध मोबाइल अॅप सहज उपलब्ध होत असल्याचे ई-कॉमर्स कंपन्यांची विक्री आणि उत्पन्न दोन्ही वाढत असल्याचे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. ऑनलाइन व्यवहार करणा-या फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि जबाँग यांच्या एकूण उत्पन्नातील ५० टक्के उत्पन्न हे मोबाइलवरील खरेदीचे असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. अहवालात हे नमूद करण्यात आले आहे की, या कंपन्या ग्राहकांना रिअल टाइम सोल्युशन देत आहेत आणि ग्राहकदेखील याबरोबरच विविध प्रकारच्या योजनांची मागणी करत आहेत. अशा परिस्थितीत ई-कॉमर्स कंपन्यांना या सेवा देताना सुरक्षितता, गोपनीयता आणि पारदर्शी व्यवहार ठेवावे लागणार आहेत.

पैसे भरण्याचे माध्यम
गुगल ग्लास आणि अॅपल वॉचसारख्या उत्पादनामुळे ई-कॉमर्स कंपन्यांना जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पाेहोचणे अधिक सोपे झाले आहे. ई-कॉमर्स कंपन्यांनी अशा नव्या उत्पादनावर लक्ष ठेवले पाहिजे. कारण शहरी ग्राहकांमध्ये अशा उत्पादनांची अधिक मागणी आहे. तसेच जास्त ग्राहक कॅश आॅन डिलिव्हरीवर पैशाचा व्यवहार करणे पसंत करतात. त्यानंतर डेबिट आणि क्रेडिट कार्डचा नंबर लागतो.

सुविधांबाबत सूचना
ऑनलाइन व्यवहार करणा-या कंपनीने खरेदी करणा-या ग्राहकासाठी सर्च लूट जसे की, उत्पादनाविषयी सविस्तर माहिती, दोन वस्तूंच्या किमतीमधील तुलना, त्यांची रेटिंग आणि समीक्षा अशा सुविधा दिल्या पाहिजेत, अशा सूचना या अहवालात करण्यात आल्या आहेत.