आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅगीची २० कोटींची पाकिटे, झाल्या ३५०० चाचण्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मॅगी उत्पादन डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात दाखल होईल. हा पदार्थ खाण्यायोग्य असल्याबाबतच्या सर्व चाचण्या मॅगीने पूर्ण केल्या असून नेस्ले कंपनीनुसार, मॅगीच्या २० कोटी रुपये किमतीच्या ३५०० पॉकेट्सवर ३५०० चाचण्या घेण्यात आल्या. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळांत त्या घेण्यात आल्या. या अहवालात मॅगी निर्दोष ठरली आहे.
नेस्लेच्या प्रवक्त्याने सांगितले, नव्याने याचे उत्पादन सुरू करण्याची प्रक्रिया खूप मोठी आहे. यासाठी गुंतवणूकदारांपासून वितरकांपर्यंतची साखळी पुन्हा जोडावी लागेल. देशात नेस्लेच्या आठपैकी पाच कारखान्यांत मॅगी तयार केली जाते. प्रत्येक प्रकल्पात समान तंत्र वापरले जाते. एफएसएससी २२००० प्रमाणपत्र व समान दर्जानुसार मॅगीची निर्मिती केली जाते. हा दर्जाच विश्वासाचे प्रतीक असल्याने याच्याशी कधीही तडजोड केली जाणार नाही, असे नेस्लेने म्हटले आहे. सध्या ‘वुई मिस यू मॅगी’ ही शॉर्ट फिल्म सध्या सोशल मीडियावर गाजते आहे. ग्राहक किती प्रेम करतात याचे हे प्रतीक असल्याचे नेस्लेने म्हटले आहे.