आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील नऊ साखर कारखान्यांना पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोल्हापूर जिल्ह्यातील यलगुड येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्तम कामगिरीसाठी वसंतदादा पाटील पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय राज्यातील अन्य ८ सहकारी साखर कारखान्यांनाही विविध श्रेणीत राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

येथील सिरी इन्स्टिट्यूट भागातील एनसीयूआय सभागृहात आयोजित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या (एनएफसीएसएफ) संचालक मंडळाच्या ५७ व्या बैठकीत संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे उपाध्यक्ष अमित कोरे आणि व्यवस्थापकीय संचालक एम. जी. जोशी या वेळी उपस्थित होते.
या वर्षी देशभरातून ९० सहकारी साखर कारखान्यांनी पुरस्कारासाठी अर्ज केले होते. पैकी २१ कारखान्यांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील ९ कारखान्यांचा समावेश आहे. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्यातील पुरस्कारप्राप्त कारखान्यांमध्ये देशातून सर्वोत्तम कामगिरीसाठी वसंतदादा पाटील पुरस्कार प्राप्त करणारा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील यलगुड येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा या वेळी सन्मान करण्यात आला. देशात उच्च प्रतीच्या साखर उत्पादनासाठी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल येथील क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ऊस विकासाचे दोन्ही
पुरस्कार राज्याला
आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील समर्थ सहकारी साखर कारखान्याला प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बाजीराव पावसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशात ऊस विकास कार्यक्रमात उत्तम कामगिरीसाठी प्रदान करण्यात आलेले दोन्ही पुरस्कार महाराष्ट्राने पटकावले. प्रथम पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दत्तनगर येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला प्रदान करण्यात आला आहे.
छायाचित्र: पुरस्कार स्वीकारताना समर्थ सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...