आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"मेक इन इंडिया'त "मनपसंद बेवरेजेस'ची उत्पादने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फळांचा ज्यूस बनवणारी देशातील प्रमुख कंपनी मनपसंद बेवरेजेस लिमिटेड मुंबईत आयोजित "मेक इन इंडिया' सप्ताहात वेगळी ओळख तयार करण्यास सज्ज अाहे. भारतीय बाजारातील एकमेव "प्योर-प्ले बेवरेज कंपनी मनपसंद' या प्रदर्शनामध्ये कार्बोनेटेड फ्रूट ड्रिंक्स आणि प्रीमियम फ्रूट ज्यूसचे उत्पादने सादर करणार अाहे.

शेतकऱ्यांना उत्पादनासाठी नवी बाजारपेठ मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुराष्ट्रीय कोला कंपन्यांना एअरेटेड ड्रिंक्ससोबत कमीत कमी पाच टक्के फळांचा ज्यूस मिसळण्याचा सल्ला दिला होता. असे झाल्यास शेतकऱ्यांना उत्पादने स्वस्त विकण्याची आवश्यकता नाही आणि देशातील खाद्य उत्पादनावर प्रक्रियेच्या माध्यमातून ३० ते ४० हजार कोटी रुपयांची बचत होईल. मनपसंदचे अध्यक्ष आणि एमडी धीरेंद्र सिंह म्हणाले की, छोट्याशा गुंतवणुकीसह आम्ही संशोधन आणि विकासाचे काम सुरू केले आहे. यात आम्ही "फ्रूट्स-अप' सादर करण्यात यशस्वी झाल्याचा आम्हाला आनंद आहे. देशात मजबुतीसह विस्तार करून जागतिक बेवरेज कंपनीच्या स्वरूपात विकास करणार आहोत. त्याचप्रमाणे जास्तीचे नैसर्गिक आणि आरोग्यवर्धक पेय पदार्थ सादर करायचे आहेत.
कंपनीचे फ्रूट ज्यूस आणि आंबा, सफरचंद, पेरू, लिची, संत्रा आणि मिक्स फळांची उत्पादने उपलब्ध आहेत. कंपनीने नवीन निर्मितीसह विस्तारासाठी आयपीओच्या माध्यमातून ४०० कोटी रुपये जमा केले आहेत. मनपसंद देशात पॅकेजिंग ज्यूस विक्री करते, जे गेल्या पाच वर्षांत २८ टक्के सीएजीआर
दराने वाढले आहेत.