आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय इच्छापत्र दस्त करून ठेवा: ज्येष्ठांसाठी इच्छापत्राची नवी पद्धत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदेशात अशा इच्छापत्राला लिव्हिंग विल असे म्हणतात. साधारणत: ज्या व्यक्तीचे महिला अथवा पुरुषाचे वय हे ७५ चे वर आहे. अशा व्यक्तीस असे इच्छापत्र करावयास हरकत नाही, वर म्हटल्याप्रमाणे इच्छापत्राचा कोणताच कायदा आज अस्तित्वात नाही.

ज्येष्टांची व्याख्या विविध क्षेत्रांत वेगवेगळी आहे. असे असणे अयोग्य आहे. आयकर कायद्यानुसार ६० वर्षांच्या वरील व्यक्तीस ज्येष्ठ नागरिक म्हणतात. तसेच रेल्वेमध्येही हेच वय मान्य आहे. राज्य सरकारच्या व्यवसाय कर कायद्यात याच ज्येेष्ठाला ६५ वर्षे पूर्ण होऊ द्यावी लागतात. तसेच राज्य परिवहनच्या नियमानुसारही ६५ वर्षांनंतरच ज्येष्ठता मान्य होते. भारतीय जीवन विमा निगममध्ये काही पॉलिसीजच्या बाबतीत पूर्वी ५८ वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिक असे संबोधिल्या जात होते. वरील बाबतीत एकवाक्यता आणण्याची आवश्यकता आहे. एका देशात एकाच बाबतीत वेगवेगळे नियम ही बाब चांगल्या विधी प्रशासनाचे द्योतक नव्हे.
वैद्यकीय इच्छापत्र : इच्छापत्राच्या बाबतचा कायदा आज अस्तित्वात नाही. इच्छापत्र ही संकल्पना विदेशी आहे. भारतीय संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंबपद्धती मान्यताप्राप्त आहे. यानुसार जे आहे ते सर्व कुटुंबाचेे अशीच मनोभूमिका होती. आपण व आपली संपत्ती असो, सुख-दु:ख किंवा अन्य सर्वच बाबींना सामुदायिक म्हणजेच एका पूर्ण कुटुंबाबाबत विचार केल्या जात असे. आताशा मात्र मी माझा एवढाच विचार केला जातो असा आमूलाग्र बदल सामाजिक व कौंटुबिक स्थितीत झाला.

उतारवयात कुटुंबावर आर्थिक भार नको
व्यक्ती ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. त्यांना प्रकृतीचा फारसा त्रास नाही. तरीही भविष्यात त्रास हा होणारच अशावेळी कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून ही वैद्यकीय इच्छापत्र नावाची दस्त करून ठेवण्याची पद्धती आहे. आताशा असणारे महागडे वैद्यकीय उपचार जसे की कृत्रिम नलिकेद्वारे अन्न देणे, व्हेंटिलेटर लावणे, डायलेसिसवर ठेवणे, ब्लड ट्रान्समिशन करणे, वगैरे या सर्व उपचारांना प्रचंड खर्च तर येतोच व त्यामुळे आयुष्य हे अगदी थोड्या कालावधीसाठी वाढते हे जरी खरे असले तरी असे अंथरुणाला खिळून पडलेले आयुष्य काय कामाचे. तसेच असे आयुष्य की जे कुटुंबाचे सारखे आर्थिक शोषण तर करतेच व ज्या आयुष्याला कोणतीही उपयोगीता म्हणून मुळीच नाही. (क्रमश:)

वृद्धत्व सुखद व्हावे असा मार्ग पाहावा
वृद्धत्व हीच एक समस्या होय. तिच्यावर मार्ग काढला पाहिजे व वृद्धत्व जास्त सुखद कसे होईल. समस्यामुक्त कसे होईल. तसेच मृत्यू अगदी सहजतेने कसा येईल व मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले. कुटुंबाची दाणादाण झाली. आर्थिकतेची फार मोठी दरी वृद्धांच्या मृत्यूमुळे पडली असे जरी होणार असले तरी ही दरी कशी कमीत कमी खोलीची होईल व शक्यतोवर सुखद होईल. असे करण्याचा हा प्रयत्न आहे.

लिव्हिंग विल एक भावनात्मक जुळवणूक
ज्यांचे वय हे ७५ चे वर आहे. त्यांनी इच्छापत्र करावयास हरकत नाही, कठीण म्हणजे लिव्हिंग विल करण्याबाबत कायद्याचा कोणताही आधार आजतरी समर्थपणे देता येणार नाही. ही एक भावनात्मक जुळवणूक असून तरुण असलेल्या मुलांना व नातेवाइकांना आपण काहीच करू शकलो नाही असे वाटू नये व आपण उगाच खर्चाकडे पाहिले व वयस्क व्यक्तीस गमावले, असे वाटू नये म्हणून अशा वयस्क व्यक्तीनेच स्वत:हून हे वैद्यकीय इच्छापत्र तयार करून ठेवावे व सर्वांना हे करावे किंवा करू नये या धर्म संकटापासून वाचवावे.