आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Micro Financial Institute Raise 20 Thousand Crores Capital

सूक्ष्म वित्त संस्था उभारणार २० हजार काेटींचे भांडवल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील सूक्ष्म वित्त संस्थांनी पुढील १८ महिन्यांमध्ये २० हजार काेटी रुपयांचे वाढीव भांडवल उभारण्याचा विचार केला असल्याचे या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणा-या ‘मायक्राे फायनान्स इन्स्टिट्युशन्स नेटवर्क’ या संस्थेचे उपाध्यक्ष अार. भास्कर बाबू यांनी सांगितले. बँकेकडून कर्ज घेऊन, खासगी समभाग कंपन्यांच्या गुंतवणूक अाणि कर्ज अशा संमिश्र माध्यमातून हा निधी उभारण्यात येणार असल्याचे बाबू यांनी सांगितले.

विद्यमान अार्थिक वर्षात सूक्ष्म वित्त संस्थांनी बँकांच्या माध्यमातून १५ हजार काेटी रुपयांचा निधी उभारला अाहे. दाेन हजार काेटींचा निधी खासगी समभाग कंपन्या अायएफसीसारख्या अन्य संस्थांकडून १८ महिन्यांत उभारला जाईल, असेही ते म्हणाले. बिगर परिवर्तनीय राेख्यांच्या माध्यमातून सूक्ष्म कर्जदार दाेन ते तीन हजार काेटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ग्राहक हेल्पलाइन
मायक्राे फायनान्स इन्स्टिट्युशन नेटवर्क अाणि स्वयंनियामक संघटना (एसअारअाे) यांनी सूक्ष्म वित्त संस्थांच्या ग्राहकांसाठी १८१००२७०३१ हा राष्ट्रीय पातळीवरील हेल्पलाइन क्रमांक सुरू केला अाहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या तक्रारी नाेंदवण्यासाठी हा माेफत मंच उपलब्ध झाला अाहे.