आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रोसॉफ्ट देणार सहा महिन्यांची प्रसूती रजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मायक्रोसॉफ्ट इंडियाने महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजेत दुपटीने वाढ केली अाहे. आतापर्यंत अाई झाल्यास कर्मचाऱ्यांना पगारासोबतच तीन महिन्यांची सुटी मिळत होती. आता ती सहा महिने करण्यात आली आहे. या सहा महिन्यांनंतरही पुढील दोन वर्षांपर्यंत आपल्या सवडीनुसार कार्यालयात येण्याची त्यांना सूट देण्यात आली आहे. प्रसूती रजेबाबतचा हा नवा नियम एक फेब्रुवारीपासून लागू हाेणार आहे. सध्या प्रसूती रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही ही सवलत देण्यात येणार आहे. पुरुष कर्मचाऱ्यांनादेखील दोन आठवड्यांची सुटी देण्यात येणार आहे.
मूल दत्तक घेतल्यास महिलांना आठ आठवडे आणि पुरुषांना दोन आठवड्यांची सुटी देण्यात येणार आहे. या काळातला पगारही दिला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांतच फ्लिपकार्ट, मिंत्रा, मोंडेलेज इंडिया (आधीची कॅडबरी) के. रहेजा कॉर्पसारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मातृत्व आणि पितृत्व सुट्यांमध्ये जास्त सवलती देण्याची घोषणा केली आहे. खासगी कंपन्यांमध्ये सध्या महिलांना कायद्यानुसार १२ आठवड्यांची प्रसूती रजा घेण्याचा अधिकार आहे.