आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रोसॉफ्टचे विंडोज १० सादर, तूर्त पहिली आवृत्ती केवळ संगणक-टॅब्लेटसाठी वापरणे शक्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्को - मायक्रोसॉफ्टने आपले विंडोज १० सॉफ्टवेअर सादर केले आहे. तंत्रज्ञानात झपाट्याने होणा-या बदलांमुळे लोक स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, ऑनलाइन माहितीचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. या स्मार्टफोनच्या युगात स्वत:चा ठसा कायम ठेवण्यासाठी मायक्रोसॉफ्टने विंडोज १० सादर केले. संगणकयुगात मायक्रोसॉफ्टची मोहोर कायम राहिली. आता विविध गॅजेटमध्ये अस्तित्व कायम राखण्यासाठी मायक्रोसॉफ्टने विंडोज १० सादर केले आहे.

२० वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ९५ ला पर्याय नव्हता. मात्र, आज कंपनीला तीव्र स्पर्धा निर्माण झाली असल्याने विंडोज १० अधिकाधिक लोकांनी डाऊनलोड करण्यासाठी कंपनीला विशेष विपणन तंत्र वापरावे लागेल. जागतिक स्तरावर विपणन मोहीम राबवून ग्राहकाभिमुख सेवेसाठी सध्या कंपनी प्रयत्न करत आहे.

३ वर्षांत १ अब्ज ग्राहकांचे उद्दिष्ट
बेस्ट बाय, स्टॅपल्स, वॉलमार्टमध्ये विंडोज १० इन्स्टॉल केलेले संगणक, लॅपटॉप लवकरच उपलब्ध होतील. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी ३ वर्षांत १ अब्ज ग्राहक मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

पुढे वाचा.. विंडोज १० ची काही खास वैशिष्ट्ये