आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Microsoft मध्ये पुन्हा Job Cuts, 7800 कर्मचार्‍यांची जाणार नोकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जगातील दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी 'मायक्रोसॉफ्ट'ने पुन्हा एका नोकर कपातीची घोषणा केली आहे. यावेळी जवळपास आठ हजार कर्मचार्‍यांची कपात केली जाणार आहे. मोबाइल हँडसेट बिझनेस सेक्शनमधील 7,800 कर्मचार्‍यांनी नोकरी जाणार आहे. कंपनीत सद्यस्थिती एकून 1 लाख 28 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. सत्या नडेला यांनी जून 2014 मध्ये आपल्या सर्व बिझनेस ग्रुप्सला एक ई-मेल केला होता. आपल्या कामाप्रती जागृत राहा, अन्यथा विचार करावा लागेल, असा इशारा दिला होता.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ आणि भारतीय वंशाचे सत्या नडेला यांनी कर्मचार्‍यांना ई-मेलद्वारे ही 'बॅड न्यूज' दिली आहे. यात किती भारतीय नोकरदार असतील, याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, सत्या नडेला यांनी मागील वर्षी 'मायक्रोसॉफ्ट'च्या सीईओ पदाची सूत्रे हाती घेतले होते. तेव्हा नडेला यांनी 18 हजार कर्मचार्‍यांची कपात करण्‍याची घोषणा केली होती.
मायक्रोसॉफ्टने मागील वर्ष एप्रिल महिन्यात 'नोकियाचा मोबाइल डिव्हाइस आणि सर्व्हिस बिझनेसचे 7.2 अब्ज डॉलरमध्ये अधिग्रहन केले होते. परिणामी मायक्रोसॉफ्टच्या कर्मचारी संख्येत वाढ झाली होती. मायक्रोसॉफ्टने नोकिया हॅंडसेट बिझनेस खरेदी केला तेव्हा त्यात चेन्नई येथील प्रकल्पाचा समावेश नव्हता. या प्रकल्पावरून सध्या वाद सुरु आहे. त्यामुळे नोकर कपातीची भारतीय नोकरदारांवर जास्त प्रभाव पडण्याची शक्यता तशी कमीच आहे. नोकियाचे अधिग्रहण आणि त्यावर झालेला खर्च 7.6 अब्ज डॉलर्स (जवळपास 483.5 अब्ज रुपये) बुडीत खात्यात गेल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.
याशिवाय यापूर्वी 30 जूनला मायक्रोसॉफ्टने ऑनलाइन डिस्पले अॅडव्हर्टाइजिंगचा बिझनेस 'एओएल'ला विकण्याचा निर्णय घेतला होता. मायक्रोसॉफ्टला या बिझनेसकडून खूप अपेक्षा होती.