आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री, अधिकाऱ्यांनी सोशल मीडिया वापरावा - जेटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारच्या कामात पारदर्शकता यावी यासाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करावा, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या वतीने सेवा नियमांचा मसुदा मांडण्यात आला. याअंतर्गत फेसबुक, टि्वटर आणि लिंक्डइन अशा प्रकारचा सोशल मीडिया वापरण्याची परवानगी मागण्यात आली. या पार्श्वभूमीवर जेटली यांनी सोशल मीडिया वापरण्यास हरकत नसल्याचे म्हटले. परंतु सरकारच्या धोरणावर टीका केलेली चालणार नाही. मसुद्यानुसार अधिकाऱ्यांना टीव्ही, सोशल मीडिया किंवा इतर कुठल्याही संवाद माध्यमाद्वारे सरकारविषयी वाईट बोलण्याची मुभा नाही.
सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांकडून वेगवेगळी मते मांडली जातात, टीका केली जाते, सूचना मांडली जाते. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी, मंत्र्यांनी त्यांची मते मांडली तर त्यात गैर काही नाही, असे जेटली म्हणाले. सोशल मीडियाच्या फायद्यांबद्दल बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भर दिला. यात ते म्हणाले, पूर्वी मोठ्या शहरातील नागरिकांकडून मते आणि सूचना मागवल्या जायच्या, परंतु सध्याच्या स्थितीत सोशल मीडियामुळे मते मुक्तपणे मांडली जात आहेत. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जागरूक झाले आहेत. सोशल मीडिया वापरण्यासाठी खर्च कमी आणि फायदे अमाप असल्याने सरकारी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा वापर करणे गरजेचे असल्याचे जेटली यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...