आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सरकार रोजगार निर्मितीला देणार 1224 कोटी, बजेटमध्ये 20% वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रोजगाराच्या प्रश्नावरुन मोदी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले जात आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तर दररोज मोदींवर टीका करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान रोजगार योजनेला आणखी मजबुत केले जाणार आहे. या योजनेचे बजेट सुमारे २० टक्क्यांनी वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. २०१७-१८ मध्ये या योजनेवर १०२४ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती. आता सरकारने यात वाढ केली असून पुढील वर्षी तब्बल १२२४ कोटी रुपये यावर खर्च करण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल अॅण्ड मिडियम इंडरप्रायजेस आणि डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर यांची मिटिंग झाली होती. त्यात यावर सहमती झाली आहे.

 

किती असेल बजेट
मिनिस्ट्री ऑफ एमएसएमआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की अर्थ मंत्रालयाने रोजगार योजनेत २०० कोटी रुपयांची वाढ करण्यास अनुकूलता दर्शवली आहे. तसेच खादी रिफॉर्म डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि टेक्नॉलॉजी सेंटर सिस्टिम प्रोग्रामचे बजेट ५६३ कोटी रुपयांनी वाढविले जाणार आहे.

 

पुढील स्लाईडवर वाचा या स्कीमची महत्त्वपूर्ण माहिती... असा होईल फायदा...

बातम्या आणखी आहेत...