आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन स्वरुपात येणार केंद्र सरकारच्या नवीन स्कीम, 2019 मध्ये जनतेला आकर्षित करण्याचा हा आहे प्लॅन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 2019 ची तयारी मोदी सरकारने आताच सुरु केली आहे. या अंतर्गत केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या स्कीम्स नव्या स्वरुपात सादर केल्या जाणार आहेत. त्यातून जनतेला जास्तीत जास्त लाभ मिळावा यावर सरकार भर देत आहे. लवकर रिझर्ल्ट मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जनतेला लाभ मिळाला तर त्याची परिणिती निवडणूक निकालांमध्ये दिसून येईल असा उद्देश यामागे आहे.
 
अर्थमंत्रालयाने लिहिले पत्र
यासंदर्भात अर्थमंत्रालयाने केंद्र सरकारमधील सर्व मंत्रालयांना लेटर लिहिले आहे. यात सांगितले आहे, की संबंधित मंत्रालयांनी त्यांच्या स्कीमचा रिव्ह्यू करावा. जर काही त्रुटी दिसून आल्या तर नवीन गाईडलाईन्स राजी कराव्यात.
 
राज्य सरकारच्या स्तरावर बदल नाही
गाईडलाईन्समध्ये सांगितले आहे, की केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या स्कीमवर टार्गेट ग्रुप डोळ्यांसमोर ठेवून काम केले जाते. अशा वेळी त्याच्या डिझाईनसह इतर बाबींवर बारकाईने लक्ष दिले जाते. त्यामुळे कोणत्याही राज्य सरकारला या स्कीममध्ये फेरबदल करता येणार नाही.
 
पंतप्रधान आणि नॅशनल मिशन या शब्दांमध्ये बदल होणार नाही
काही योजनांमध्ये पंतप्रधान आणि नॅशनल मिशनचा उल्लेख असतो. अशा शब्दांमध्ये बदल केला जाणार नाही असे सांगण्यात आले आहे. लोकल लेव्हलवर त्यात बदल केले जाऊ नये याकडे लक्ष दिले जाणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजना सारख्या स्कीमच्या नावात बदल होणार नाही.
 
मिड-डे मील आणि फूड सिक्युरिटी स्कीमवर नजर
डिपार्टमेंट ऑफ फुड अॅण्ड पीडीएस द्वारे मिड-डे मील आणि सिक्युरिटी स्कीम चालवली जाते. तिला डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कोऑर्डिनेशन आणि मॉनिटर्रिंग कमेटीच्या फ्रेमवर्कमध्ये आणली जावी. त्यामुळे आणखी चांगल्या पद्धतीने त्यावर लक्ष ठेवणे शक्य होईल.
 
आधार आणि मोबाईल क्रमांक होईल युज
केंद्र सरकारकडून ज्या समाजासाठी स्कीम चालविल्या जातात त्यासाठी एक विशिष्ट डाटाबेस तयार केला जाईल. त्याला आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाशी जोडले जाईल.
बातम्या आणखी आहेत...