आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monsoon Sale: Air India Offers Ticket At Rs 1,777

मान्सून ऑफर्स : विमान कंपन्यांच्या प्रवाशांसाठी पायघड्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सुट्यांचा हंगाम संपला. विमान कंपन्यांनी सुटीचा हंगाम कॅश करण्यासाठी अनेक ऑफर्स दिल्या. आता पावसाळा सुरू होत आहे. पावसाळी हंगामात प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी देशातील विविध विमान वाहतूक कंपन्यांनी मान्सून ऑफर्स जाहीर केल्या आहेत. एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो, एअर एशिया, स्पाइसजेटकडून तिकीट दरात सवलत जाहीर करण्यात आली आहे.

प्रीपेड कुपन ऑफर : १२९९ रुपये
इंडिगोने त्यांच्या नेहमीच्या प्रवाशांसाठी ६-ई पास नावाची ऑफर दिली आहे. यात प्रीपेड व्हर्च्युअल कुपन कंपनीकडून देण्यात येईल. हे कुपन दोन प्रकारांत आहेत. राष्ट्रीय व प्रादेशिक परमिट मिळतील. राष्ट्रीय परमिटसाठी ४२ हजार रुपये तर प्रादेशिक परमिटसाठी २१ हजार रुपये दर ठेवण्यात आला आहे. यामुळे या प्रवाशांना केव्हाही, कोठेही प्रवास करता येईल. यावर तिकीट दरांतील चढ-उताराचा परिणाम होणार नाही.

बिझनेस क्लास दरात २५ टक्के कपात : जेट एअरवेजने देशांतर्गत उड्डाणांच्या बिझनेस क्लास तिकीट दरात २५ टक्के कपात जाहीर केली आहे. ही ऑफर २० जून रोजी सुरू होणार आहे. यामुळे भोपाळ-मुंबई एकेरी प्रवास १९,७७५ रुपयांत, तर चेन्नई-पुणे प्रवास १२,४७४ रुपयांत बिझनेस श्रेणीतून करता येणार आहे.